Lokmat Money >बँकिंग > HDFC बँकेनं कर्जदारांना दिला 'जोर का झटका'; व्याज दरात केली ५० बेसिस पॉइंटनं वाढ

HDFC बँकेनं कर्जदारांना दिला 'जोर का झटका'; व्याज दरात केली ५० बेसिस पॉइंटनं वाढ

रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात रेपो दरात ५० बेसिस पॉईंटने वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 07:10 PM2022-09-30T19:10:09+5:302022-09-30T19:10:39+5:30

रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात रेपो दरात ५० बेसिस पॉईंटने वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

hdfc ltd bank hikes interest rate by 50 bps | HDFC बँकेनं कर्जदारांना दिला 'जोर का झटका'; व्याज दरात केली ५० बेसिस पॉइंटनं वाढ

HDFC बँकेनं कर्जदारांना दिला 'जोर का झटका'; व्याज दरात केली ५० बेसिस पॉइंटनं वाढ

नवी दिल्ली-

रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात रेपो दरात ५० बेसिस पॉईंटने वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. HDFC बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आयबीआयच्या निर्णयानंतर HDFC बँकेने आपल्या व्याजदरात ५० bps ने वाढ केली आहे आणि हे वाढलेले व्याजदर शनिवार 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. यामुळे आता ग्राहकांना वाढीव दरांच्या आधारे व्याज द्यावे लागणार असून त्यांच्या EMI मध्येही वाढ होणार आहे. 

सणासुदीपूर्वी रिझर्व्ह बँकेचा पुन्हा झटका, EMI वाढणार; Repo Rate मध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ

या वाढीनंतर एचडीएफसी बँकेकडून गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व कर्ज घेणे महाग होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेण्यासाठी अधिक व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजेच ग्राहकांना आता आपला खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. याआधी एचडीएफसी बँकेने ७ जून २०२२ रोजी कर्जदरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक आढावा बैठकीच्या निकालापूर्वी एचडीएफसी बँकेने हे पाऊल उचलले. बँकेने दोन महिन्यांतील व्याजदरात केलेली ही दुसरी वाढ आहे. HDFC बँकेने दोन वेळा कर्जावरील व्याजदरात ०.६० टक्क्यांनी वाढ केली होती. 

'होमलोन' घेताय मग 'या' महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या, मग नाही येणार घर लिलावाची वेळ!

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) बैठक आज संपन्न झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देत ​​रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.

EMI किती वाढणार?
समजा तुम्ही २० लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल. कर्जाचा कालावधी २० वर्षे आहे. आता तुम्हाला ८ टक्के व्याजदरानं एका महिन्यात १६,७२९ रुपयांचा EMI भरावा लागेल. याआधी तो ७.५ टक्के व्याजदरानुसार तुमचा मासिक EMI १६,११२ रुपये होता. म्हणजेच अशा प्रकारे तुमच्या गृहकर्जाचा मासिक हफ्ता ६१७ रुपयांनी वाढला आहे. नवीन व्याजदरावर तुम्हाला एकूण २०,१४,९१२ रुपये व्याज द्यावे लागेल. पूर्वी एकूण मिळून १८,६६,८४६ रुपये व्याज होते. म्हणजेच, तुम्हाला एकूण १,४८,०६६ रुपये अतिरिक्त व्याज द्यावं लागणार आहे.

जर तुम्ही २० वर्षांच्या कालावधीसह ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल तर व्याजदर अर्धा टक्का वाढवल्यानंतर तुम्हाला दरमहा २५,०९३ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. तुम्हाला संपूर्ण कालावधीसाठी एकूण ३०,२२,३६७ रुपये व्याज द्यावे लागेल. सध्या तुम्हाला २४,१६८ रुपये मासिक EMI भरावा लागेल. व्याजदर वाढल्यानंतर तुमचा मासिक ईएमआय ९२५ रुपयांनी वाढेल. त्याचवेळी २० वर्षांमध्ये तुम्हाला २,२२,०९४ रुपये अतिरिक्त व्याज द्यावं लागेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: hdfc ltd bank hikes interest rate by 50 bps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.