Join us

हिंदुजा समूह Indusind Bank मध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक करणार, भागीदारी २६ टक्क्यांवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 4:15 PM

या वृत्तानंतर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये शुक्रवारी ३ टक्क्यांची वाढ झाली.

इंडसइंड बँकेतील (Indusind Bank) हिस्सा वाढवण्यासाठी हिंदुजा समूह १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी चर्चा करत आहे. हा करार आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होऊ शकतो. या वृत्तानंतर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये शुक्रवारी ३ टक्क्यांची वाढ झाली. इटी नाऊनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जात आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिंदुजा ग्रुपला इंडसइंड बँकेतील त्यांचा हिस्सा २६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी देऊ शकते. या रिपोर्टनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. शुक्रवारी कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात या शेअरची किंमत NSE वर १३०९.४० रुपये होती.

इंडसइंड बँकेत प्रमोटर्सची भागीदारी अल्प होती. मार्च महिन्याच्या अखेरिस बँकेत प्रमोटर्सची भागीदारी १६.६१ टक्के होती. यामध्ये इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सकडे १२.५८ टक्के आणि इंडसइंड लिमिटेडकडे ३.९२ टक्के भागीदारी होती. या वर्षात बँकेच्या शेअरमध्ये आतापर्यंत ७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळालीये. तर गेल्या एका वर्षात बँकेचा शेअरनं ६७ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलेत. 

गेल्या महिन्यात बँकेचं मार्केट कॅप तीन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये या मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते.

टॅग्स :गुंतवणूकपैसाबँक