Join us

October Bank Holidays: ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! देशभरात २१ दिवस बँका बंद असणार; महाराष्ट्रात किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 5:02 PM

महिन्याच्या जेवढे दिवस उघड्या असतात तेवढे दिवस बँका बंद असणार; ऑक्टोबर पळव पळव पळवणार

ऑक्टोबर महिना हा असा महिना आहे, ज्यात दसरा, दिवाळी येत आहे. यामुळे या महिन्यात देशभरातील राज्यांच्या सुट्ट्यांचा विचार करत महिन्याच्या जेवढे दिवस बँका सुरु असतात तेवढे दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या ठिकाणानुसार सुट्ट्या आणि बँकांचे नियोजन करावे लागणार आहे. 

ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रसह विविध राज्यांत २१ दिवस बँका बंद असणार आहेत. म्हणजेच १० दिवस बँकांचे कामकाज सुरळीत सुरु असणार आहे. एवढे दिवस बँका बंद असल्याने या उरलेल्या कामाच्या दिवशीदेखील बँकांत गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण याच महिन्यांत करोडो लोकांच्या खात्यात त्यांच्या त्यांच्या कंपन्यांचा बोनस जमा होणार आहे. 

RBI ने ऑक्टोबर महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. राज्यानुसार काही प्रादेशिक सुट्ट्या यात आहेत. मात्र, सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 

आरबीआयनुसार बँकांचे हॉलिडे...

  • १ ऑक्टोबर २०२२- बँक खाती अर्धवार्षिक बंद करणे (गंगटोक)
  • २ ऑक्टोबर २०२२- गांधी जयंती, रविवार (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • ३ ऑक्टोबर २०२२- दुर्गा पूजा (अगरताळा, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा आणि रांची)
  • 4 ऑक्टोबर 2022- श्रीमंत शंकरदेवाची पूजा, दुर्गा पूजा/दसरा/ शस्त्रपुजन/जन्मोत्सव (अगरताळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, पटना, रांची, शिलाँग आणि तिरुवनंतपुरम)
  • ५ ऑक्टोबर २०२२- दसरा (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 6 ऑक्टोबर 2022- दुर्गा पूजा (गंगटोक)
  • 7 ऑक्टोबर 2022- दुर्गा पूजा (गंगटोक)
  • 8 ऑक्टोबर 2022- दुसरा शनिवार सुट्टी (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 9 ऑक्टोबर 2022- रविवार (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 13 ऑक्टोबर 2022- करवा चौथ (शिमला)
  • 14 ऑक्टोबर 2022- शुक्रवार नंतर ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि श्रीनगर)
  • 16 ऑक्टोबर 2022- रविवार (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 18 ऑक्टोबर 2022- काटी बिहू (गुवाहाटी)
  • 22 ऑक्टोबर 2022- चौथा शनिवार (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 23 ऑक्टोबर 2022- रविवार  (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 24 ऑक्टोबर 2022- काली पूजा/दिवाळी (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 25 ऑक्टोबर 2022- लक्ष्मी पूजा/दिवाळी/गोवर्धन पूजा (गंगटोक, हैदराबाद, इंफाळ आणि जयपूर) (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 26 ऑक्टोबर 2022- भाऊबीज (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • 27 ऑक्टोबर 2022- भाऊबीज/ लक्ष्मी पूजा/ दिवाळी (गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनौ)
  • ऑक्टोबर 30, 2022- रविवार (महाराष्ट्रात हॉलिडे)
  • ३१ ऑक्टोबर २०२२- सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस/सूर्य पष्टी दाला छठ/ छठ पूजा (अहमदाबाद, पाटणा आणि रांची)
टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रदसरादिवाळी 2021