Lokmat Money >बँकिंग > ४० वर्षांसाठी होम लोन! EMI तर कमी असेल, पण द्यावं लागेल १३३ टक्के अधिक व्याज, पाहा गणित

४० वर्षांसाठी होम लोन! EMI तर कमी असेल, पण द्यावं लागेल १३३ टक्के अधिक व्याज, पाहा गणित

कालावधी मोठा असेल तर तुम्हाला ईएमआय कमी भरावा लागतो. असं असलं तरी त्याचा तोटा मात्र जास्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 12:12 PM2023-07-04T12:12:12+5:302023-07-04T12:12:41+5:30

कालावधी मोठा असेल तर तुम्हाला ईएमआय कमी भरावा लागतो. असं असलं तरी त्याचा तोटा मात्र जास्त आहे.

Home loan for 40 years EMI will be lower 133 percent more interest will have to be paid see details | ४० वर्षांसाठी होम लोन! EMI तर कमी असेल, पण द्यावं लागेल १३३ टक्के अधिक व्याज, पाहा गणित

४० वर्षांसाठी होम लोन! EMI तर कमी असेल, पण द्यावं लागेल १३३ टक्के अधिक व्याज, पाहा गणित

एका बड्या फायनॅन्स कंपनीनं आपल्या होम लोनसाठी सर्वाधिक टेन्योर ३० वर्षांवरून वाढवून ४० वर्ष केला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सोयीचं व्हावं यासाठी त्या कंपनीनं हा निर्णय घेतलाय. होम लोनसाठी सध्या सर्वाधिक टेन्योर ३० वर्षांचा आहे. कालावधी दीर्घ असेल तर तुमचा ईएमआय कमी होईल. परंतु त्याचे काही तोटेही आहेत. रिझर्व्ह बँकेनं गेल्या काही महिन्यांत व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे ईएमआयही वाढलाय. परंतु तुम्हाला कमी ईएमआय भरावा लागत असेल तर तो आकर्षक वाटतो. जर तुमचा टेन्योर वाढला तर तुम्हाला अधिक व्याज द्यावं लागतं. जर तुम्ही २० वर्षांच्या ऐवजी ४० वर्षांसाठी होम लोन घेतलं तर तुम्हाला १३३ टक्के अधिक पैसे द्यावे लागतील. 

कंपनीनं सुरू केलेल्या ४० वर्षांच्या होम लोनसाठी ईएमआय ७३३ रुपये प्रति लाख रूपयांपासून सुरू होतो. कंपनी संध्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कंपनी ८.५ टक्क्यांनी लोन देत आहे. केवळ २३ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांनाच यासाठी अर्ज करता येईल. कंपनीनं लोन म‌ॅच्युरिटीसाठी एज अपर लिमिट ७५ वर्षे ठेवली आहे. जर तुमचं वय ४५ वर्षे असेल तर तुम्हाला ३० वर्षांसाठी लोन मिळेल. बँक बाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार अधिक टेन्योरसाठी तुम्ही कमी ईएमआयमध्ये अधिक लोन घेऊ शकता. जर कोणाचा व्याजदर ८.५ टक्के असेल तर ३० वर्षांच्या तुलनेत ४० वर्षांसाठी ईएमआय प्रति लाख पाच टक्क्यांपर्यंत कमी असेल.

१.३३ पट अधिक व्याज
लोनचं टेन्योर वाढल्यानं ईएमआय कमी होईल परंतु व्याज खूप जास्त वाढेल. जर तुम्ही ८.६ टक्क्यांवर २० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचं लोन घेतलं तर तुम्हाला महिन्याला ४३,७०८ रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. व्याजाच्या रुपात तुम्हाला ५४.८९ लाख रुपये द्यावे लागतील. जर तुमचं टेन्योर वाढून ३० वर्ष केलं तर तुम्हाला ईएमआय म्हणून ३८,८०१ रुपये द्यावे लागतील.

परंतु व्याजाच्या रुपात तुम्हाला ८९.६८ लाख रुपये द्यावे लागतील. जर हाच कालावधी तुमचा ४० वर्ष झाला, तर तुम्हाला ईएमआयच्या रुपात ३७,०३६ रुपये भरावे लागतील. परंतु व्याज म्हणून तुम्हाला तब्बस १.२७ कोटी रुपये भरावे लागतील. ३० वर्षांच्या तुलनेत तुम्हाला ४० वर्षांच्या कालावधीसाठी ४२.५ टक्के अधिक व्याज द्यावं लागेल. तर २० वर्षांच्या तुलनेत ४० वर्षामध्ये तुम्हाला १.३३ पट अधिक व्याज द्यावं लागेल. 

Web Title: Home loan for 40 years EMI will be lower 133 percent more interest will have to be paid see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.