Lokmat Money >बँकिंग > Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या

Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या

आपलं स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण अतिशय मेहनतही करतो. होमलोनमुळे घर घेणाऱ्या अनेक लोकांची मोठी सोय झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 01:50 PM2023-12-02T13:50:06+5:302023-12-02T13:50:21+5:30

आपलं स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण अतिशय मेहनतही करतो. होमलोनमुळे घर घेणाऱ्या अनेक लोकांची मोठी सोय झाली आहे.

Home Loan gives you convenience but have you ever calculated how much you pay through EMI find out emi calculator interest | Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या

Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या

How to calculate Home Loan EMI and Innterest: आपलं स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण अतिशय मेहनतही करतो. होमलोनमुळे घर घेणाऱ्या अनेक लोकांची मोठी सोय झाली आहे. त्याच्या मदतीने ते घर घेण्याचं त्यांचं स्वप्न सहज पूर्ण करतात. मात्र, कर्ज घेतलं असल्यास त्याची परतफेड करावी लागते. बँका हे कर्ज मासिक ईएमआय म्हणून वसूल करतात. तुम्ही जितकं जास्त कर्ज घ्याल तितका तुमचा ईएमआय कमी होईल, परंतु त्याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे तुम्हाला जास्त व्याज देखील द्यावं लागेल.

साधारणपणे, कर्ज घेतल्यानंतर, लोक कधीच मोजत नाहीत की त्यांनी किती कर्ज घेतलं आणि त्या बदल्यात त्यांना किती व्याज द्यावं लागतंय. पण हिशोब केला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. समजा तुम्ही एसबीआय बँकेकडून 20 वर्षे, 25 वर्षे आणि 30 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचं कर्ज घेतल्यास बँक किती व्याज आकारते.

२० वर्षांसाठी किती व्याज
एसबीआय होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही 20 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचे कर्ज घेतलं, तर तुमचा मासिक ईएमआय 9.55 टक्के व्याजदरानं 37,416 रुपये होईल, जो तुम्हाला 20 वर्षे सतत भरावा लागेल, तो देखील हाच व्याजदर कायम राहीला तर. व्याजदर वाढल्यास तुमचा ईएमआय किंवा तुमच्या कर्जाचा कालावधी वाढू शकतो. 9.55 टक्के व्याजदरानुसार गणना केल्यास, तुम्हाला 49,79,827 रुपये म्हणजेच सुमारे 50 लाख रुपये कर्जाच्या रकमेवर व्याज म्हणून भरावे लागतील आणि मूळ रकमेसह, तुम्हाला एकूण 89,79,827 रुपये द्यावे लागतील, जे कर्जाच्या रकमेच्या दुपटीपेक्षाही अधिक आहे.

25 वर्षांसाठी किती व्याज
25 वर्षांसाठी 40,00,000 रुपये कर्ज घेतल्यास, EMI कमी होईल, परंतु व्याज वाढेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला 9.55 टक्के व्याज दरानं 35,087 रुपये मासिक EMI आणि 65,26,098 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. 40 लाखांच्या कर्जासाठी मूळ रकमेसह तुम्हाला 1,05,26,098 रुपये भरावे लागतील.

30 वर्षांसाठी किती व्याज
30 वर्षांसाठी 40,00,000 रुपयांचे कर्ज घेतल्यास, EMI 33,780 रुपयांपर्यंत कमी होईल. परंतु 9.55 टक्के व्याजानुसार, तुम्हाला 30 वर्षात व्याज म्हणून 81,60,867 रुपये द्यावे लागतील आणि जर त्यात मूळ रक्कम देखील समाविष्ट असेल, तर 40,00,000 रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तुम्हाला 1,21,60,867 रुपये भरावे लागतील. जे तुमच्या कर्जाच्या रकमेच्या तिप्पट असेल.

कसं कराल ओझं कमी?
व्याजाचं हे ओझं कमी करायचं असेल तर प्रथम बँकेकडून किमान कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. कर्जाची रक्कम एवढीच ठेवा की तुम्ही ती कमी कालावधीत परत करू शकाल. ईएमआय कमी कालावधीसाठी ठेवल्यास, ईएमआय मोठा होऊ शकतो, परंतु बँकेला जास्त व्याज द्यावं लागणार नाही. याशिवाय कर्ज लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही प्रीपेमेंट करू शकता.

यामुळे कर्जाची लवकर परतफेड करण्यात मदत होते आणि तुम्ही व्याजात भरणार असलेले लाखो रुपये वाचवू शकता. प्री-पेमेंटची रक्कम तुमच्या मूळ रकमेतून वजा केली जाते. यामुळे तुमची मुख्य शिल्लक कमी होते आणि तुमच्या ईएमआयवर देखील परिणाम होतो. हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जेव्हाही तुम्हाला कुठूनही पैसे मिळतील तेव्हा तुम्ही ते होमलोनच्या खात्यात जमा करत राहा.

Web Title: Home Loan gives you convenience but have you ever calculated how much you pay through EMI find out emi calculator interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.