home loan : सध्याच्या काळात गृहकर्जाशिवाय घर खरेदी करणे कठीण गोष्ट आहे. पण, होन लोन मिळवणेही सोपी गोष्ट नाही. यासाठी कित्येकवेळा बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. त्यानंतरही एखाद्या कागपत्रासाठी आपला अर्ज नाकाराला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही जर आधीपासूनच तयारी केली तर गृहकर्ज वेगाने मिळण्यास मदत होईल. तुमच्याकडे बँकेनुसार सर्व कागदपत्रे असतील तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल.
प्रत्येकाला ही कागदपत्रे द्यावी लागतील
- अर्जदाराचे ओळखपत्र
- कर्जाचा अर्ज पूर्णपणे भरलेला, आवश्यक तिथे पासपोर्ट आकाराचे फोटो
- आयडी पुरावा (कोणताही) जसे- पॅन/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र
- निवास/पत्त्याचा पुरावा (कोणताही) जसे की टेलिफोन बिल/वीज बिल/पाणी बिल/पाईप गॅस बिल किंवा पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्डची प्रत.
मालमत्तेची कागदपत्रे
- बांधकाम परवानगी (लागू असेल तेथे)
- विक्रीसाठी नोंदणीकृत करार (केवळ महाराष्ट्रासाठी)/वाटप पत्र/शिक्क्यासह विक्रीसाठी करार
- भोगवटा प्रमाणपत्र (रेडी टू मूव्ह मालमत्तेसाठी)
- शेअर सर्टिफिकेट (फक्त महाराष्ट्रासाठी), देखभाल बिल, वीज बिल, मालमत्ता कर पावती
- मंजूर योजनेची प्रत (झेरॉक्स ब्ल्यू प्रिंट) आणि बिल्डरचा नोंदणीकृत विकास करार, कन्व्हेयन्स डीड (नवीन मालमत्तेसाठी)
- पेमेंट पावत्या किंवा बँक अकाउंट स्टेटमेंट, ज्यामध्ये बिल्डर/विक्रेत्याने केलेली सर्व देयके असतील.
बँक अकाउंट स्टेटमेंट
- अर्जदार किंवा अर्जदारांच्या नावे असलेल्या सर्व बँक खात्यांचे मागील ६ महिन्यांचे बँक खाते तपशील
- इतर बँका/सावकारांकडून पूर्वीचे कोणतेही कर्ज असल्यास, मागील १ वर्षाचे कर्ज खाते तपशील
पगारदार वर्ग अर्जदार/सह-अर्जदार/जामीनदार यांच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा
- पगार स्लिप किंवा मागील ३ महिन्यांचे वेतन प्रमाणपत्र
- मागील २ आर्थिक वर्षांसाठी फॉर्म १६ ची प्रत किंवा मागील २ आर्थिक वर्षांच्या आयटी रिटर्नची प्रत, आयटी विभागाने स्वीकारलेली.
नॉन-पगारदार अर्जदार/सह-अर्जदार/जमीनदार यांच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा
- व्यवसाय पत्त्याचा पुरावा
- मागील ३ वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न
- मागील ३ वर्षांचे ताळेबंद आणि नफा-तोटा खाते
- व्यावसायिक परवाना विधान (किंवा समतुल्य)
- TDS प्रमाणपत्र (फॉर्म 16A, लागू असल्यास)
- सक्षमतेचे प्रमाणपत्र (सीए/डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी)
वाचा - २५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षात फिटेल; या ३ स्मार्ट टीप्स वापरा आणि टेन्शनमुक्त व्हा
CIBIL स्कोअरची काळजी घ्या
कोणत्याही बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केल्यास तुमचा CIBIL स्कोअर तपासला जातो. हा स्कोअर हे ३०० ते ९०० दरम्यान मोजला जातो. तुमचे CIBIL ८०० किंवा त्याहून अधिक असल्यास तुम्हाला गृहकर्ज सहज आणि कमी व्याजदरात मिळेल. पण जर CIBIL स्कोर कमकुवत असेल तर तुम्हाला जास्त व्याजावर गृहकर्ज घ्यावे लागेल.