Lokmat Money >बँकिंग > Home Loan होईल फ्री! सर्व व्याजाचेही पैसे होतील वसूल; तुम्हाला फक्त एक पर्याय वापरावा लागेल

Home Loan होईल फ्री! सर्व व्याजाचेही पैसे होतील वसूल; तुम्हाला फक्त एक पर्याय वापरावा लागेल

Home Loan : गृहकर्ज आपलं स्वप्न साकार करतंय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते खूप महाग पडतं. मात्र, एक पर्याय वापरुन तुम्ही तुमचं होमलोन फ्री करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 02:39 PM2024-10-13T14:39:29+5:302024-10-13T14:39:29+5:30

Home Loan : गृहकर्ज आपलं स्वप्न साकार करतंय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते खूप महाग पडतं. मात्र, एक पर्याय वापरुन तुम्ही तुमचं होमलोन फ्री करू शकता.

home loan will be free all the interest money will be recovered know what you have to do | Home Loan होईल फ्री! सर्व व्याजाचेही पैसे होतील वसूल; तुम्हाला फक्त एक पर्याय वापरावा लागेल

Home Loan होईल फ्री! सर्व व्याजाचेही पैसे होतील वसूल; तुम्हाला फक्त एक पर्याय वापरावा लागेल

Home Loan : नोकरदार लोक घर खरेदीसाठी गृहकर्जाची मदत घेतात. गृहकर्जाच्या साहाय्याने घर खरेदी करणे सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ही खूप महाग पद्धत आहे. जर तुम्ही २५ वर्षांसाठी ९.५ टक्के व्याजदराने ६० लाख रुपयांचे गृहकर्ज घेत असाल, तर तुम्हाला दरमहा सुमारे ५२ हजार ४२२ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. हा हप्ता पुढील २५ वर्षांसाठी भरल्यास, तुम्हाला फक्त व्याजापोटी ९७ लाख २६ हजार ५४० रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच तुम्ही ६० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल तर व्याजासह एकूण १ कोटी ५७ लाख रुपये द्यावे लागतील. पण, एक मार्ग आहे आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचे गृहकर्ज मोफत करू शकता.

गृहकर्जासोबत SIP सुरू करा
तुम्ही २५ वर्षांसाठी ६० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला ९.५ टक्के व्याजदराने दरमहा सुमारे ५२,४२२ रुपयांचा EMI भरावा लागेल. जर तुम्ही तुमच्या EMI च्या ११ टक्के म्हणजेच रुपये ५७६६ ची SIP सुरू केली, तर तुम्ही २५ वर्षात म्हणजेच कर्जाचा कालावधी संपेपर्यंत गृहकर्जासाठी भरलेल्या ९७,२६,५४० रुपयांपैकी सुमारे ९२,११,९६४ रुपये वसूल करू शकता.

२५ वर्षात १ कोटी ९ लाखांचा फंड
जर तुम्ही तुमच्या गृहकर्जासोबत ५७६६ रुपयांची एसआयपी सुरू केली. तुम्हाला दरवर्षी सरासरी १२ टक्के व्याज मिळत असेल, तर २५ वर्षांत तुमची एकूण एसआयपी गुंतवणूक १७ लाख २९ हजार ८०० रुपये होईल. ज्यावर तुम्हाला सुमारे ९२ लाख ११ हजार ९६४ रुपये मिळण्याचा अंदाज आहे. म्युच्युअल फंडात एकूण गुंतवणूक १७,२९,८०० लाख रुपये आणि परतावा ९२,११,९६४ असा एकूण १ कोटी ९ लाखांचा फंड तुमच्या नावावर जमा होईल.

एवढेच नाही तर तुम्ही तुमची एसआयपी आणखी फक्त १ वर्षासाठी वाढवली, म्हणजे २६ वर्षे गुंतवणूक केल्यास १२ टक्के अंदाजे परतावा नुसार तुम्हाला सुमारे १,०६,०४,३२० रुपयांचा परतावा मिळेल. अशाप्रकारे, तुम्ही २६ वर्षात तुमचे गृहकर्ज फक्त मोफतच नाही तर बरेच पैसे वाचवू शकता.

Web Title: home loan will be free all the interest money will be recovered know what you have to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.