Join us

Demand Draft बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? जाणून घ्या 'डीडी'शी निगडीत महत्त्वाच्या बाबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 2:04 PM

डिमांड ड्राफ्टचा (DD) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे सुरक्षित आणि सोयीस्कररित्या फंड ट्रान्सफरची सुविधा देते. जाणू घेऊया डिमांड ड्राफ्टबद्दल.

डिमांड ड्राफ्टचा (DD) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे सुरक्षित आणि सोयीस्कररित्या फंड ट्रान्सफरची सुविधा देते. डिमांड ड्राफ्ट (DD) हे खातेदाराच्या वतीनं बँकांद्वारे जारी केलेलं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. डिमांड ड्राफ्ट फंड ट्रान्सफर करण्याचा एक सुरक्षित मार्ग प्रदान करतो. हे समजून घेतलं पाहिजे की डिमांड ड्राफ्ट हे प्रीपेड डिव्हाइस आहे, म्हणजेच पैसे देणाऱ्यानं ते पैसे आधीच भरले आहेत आणि ते एका थर्ड पार्टीला ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये लवचिकताही येते. 

फंड ट्रान्सफरची विश्वसनीय पद्धत 

बँक खातेदारांच्या वतीनं डिमांड ड्राफ्ट जारी करतात, ज्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यांच्यासाठी हे रक्कम देण्याची गॅरंटी म्हणून काम करतात. फंड ट्रान्सफरची ही एक विश्वसनीय पद्धत आहे. याव्यतिरिक्त, डीडी फंड ट्रान्सफरचं एक सुरक्षित साधन प्रदान करतात. यामुळे व्यवहारादरम्यान फसवणूक किंवा अनऑथोराइज्ड अॅक्सेसचा धोका कमी करतात. 

डिमांड ड्राफ्ट ऑपरेशन 

डिमांड ड्राफ्ट प्रक्रिया सुरू करण्यासाठी, खातेधारकाला ज्याला पैसे द्यायचे आहेत, त्याचं नाव, रक्कम आणि आवश्यक कागदपत्रं यासारख्या तपशीलाची माहिती देणारा एक अर्ज भरावा लागेल. अर्ज प्रोसेस झाल्यानंतर, खातेदार त्याच्या खात्यातून रोखीनं किंवा डेबिटद्वारे पेमेंट करतो. त्यानंतर बँक युनिक आयडेंटिफिकेशन डिटेल्सद्वारे डिमांड ड्राफ्ट जारी करते. डिमांड ड्राफ्ट साधारणपणे तीन महिन्यांपर्यंत वैध असतो. ज्याला पैसे मिळणार आहेत त्यानं वेळेच्या मर्यादेत डीडी एनकॅश करणं किंवा जमा करणं महत्वाचं आहे, जेणेकरून त्याला नंतर कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. 

डीडी एनकॅशमेंट 

रिझर्व्ह बँकेनं (RBI) डीडीच्या एनकॅशमेंटबद्दलचे नियम बदलले आहेत. आता तुम्ही थेट डीडी कॅश करू शकत नाही. प्रथम तुम्हाला तो तुमच्या बँकेत जमा करावा लागेल. योग्य प्रोसेसनंतर, रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. तुम्ही ते नंतर परत घेऊ शकता. तुम्हाला पैसे देणारी व्यक्ती आणि तुमची बँक एकच असेल तर पसै त्वरित काढताही येऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही चेक किंवा सेल्फ विथड्रॉवल फॉर्म वापरून काही मिनिटांत रक्कम काढू शकता.

टॅग्स :बँकपैसा