आजकाल डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. अनेक गोष्टी डिजिटल झाल्यानं एका क्लिकवर घरबसल्या बरीच कामं करता येतात. आता कॅशकडे वळणारे फार कमी लोक आहेत. मोबाईल उचलला आणि केले पैसे ट्रान्सफर. यासाठी ऑनलाइन पेमेंटची व्याप्ती वाढत आहे. Google Pay हे भारतातील UPI पेमेंटसाठी वापरले जाणारे एक अॅप आहे. याद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांची नोंदही अॅपवरच राहते. इतर पेमेंट अॅप्सप्रमाणे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री Google Pay मध्ये दिसून येते. ज्याद्वारे युझर्सना आपण कोणाला पैसे पाठवले हे पाहता येतं.
दरम्यान, तुमच्याकडे ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही आहे. पाहूया GPay वरील ट्रान्झॅक्शन हिस्ट्री हटवण्याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती.
- सर्वात प्रथम गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करा.
- त्यानंतर myaccountgoogle.com टाईप करून एन्टर करा.
- नंतर तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये साईन इन करा.
- यानंतर डेटा अँड पर्सनलायझेशन पर्यायावर क्लिक करा.
- यापुढच्या स्टेपमध्ये myactivity या पर्यायावर क्लिक करा.
- My activity ओपन केल्यानंतर तुमची ट्रान्झॅक्शन्स सिलेक्ट करा.
- इथे तुम्ही तारखेनुसार ट्रान्झॅक्शन देखील निवडू शकता. तुम्हाला कोणतं ट्रान्झॅक्शन डिलीट किंवा रिमूव्ह करायचं आहे, ते निवडा.
- टाईम सिलेक्ट केल्यानंतर google pay पर्याय सिलेक्ट करा.
- google pay पर्याय सिलेक्ट केल्यानंतर डिलीट या पर्यायावर क्लिक करा.