Lokmat Money >बँकिंग > Credit Card Rule Change : ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

Credit Card Rule Change : ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

ICICI Bank Credit Card Rules : तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर लक्षात ठेवा येत्या 15 नोव्हेंबरपासून कार्डशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये काही व्यवहारांवर आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:41 PM2024-11-12T16:41:03+5:302024-11-12T16:41:44+5:30

ICICI Bank Credit Card Rules : तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर लक्षात ठेवा येत्या 15 नोव्हेंबरपासून कार्डशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये काही व्यवहारांवर आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

icici bank credit card rules change from nov 15 2024 including finance charges late payment charges | Credit Card Rule Change : ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

Credit Card Rule Change : ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

ICICI Bank Credit Card Rules : या नोव्हेंबर महिन्यापासून आर्थिक व्यवहाराशी निगडीत अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये आघाडीची खासगी बँक ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा समावेश आहे. याची घोषणा बँकेने आधीच केली होती. तुम्ही जर आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर बदललेले नियम माहिती असणे आवश्यक आहे. शुक्रवारपासून लागू होणाऱ्या बदलांमध्ये फायनान्स चार्ज, लेट पेमेंट चार्ज, शैक्षणिक व्यवहार, यूनिटलिटी ट्रांजक्शन यासह अनेक नियमांचा समावेश आहे..

फायनान्स चार्ज
ICIC बँकेच्या नवीन नियमांनुसार, एक्सटेंडेड क्रेडिटवरील थकीत व्याज आणि आगाऊ रोखीवर व्याज एका महिन्यासाठी ३.७५ टक्के आकारले जाईल, तर ४५ टक्के वार्षिक देय असेल.

लेट पेमेंट शुल्क

  • १०० रुपयांपर्यंत : कोणतेही शुल्क नाही
  • १०१ ते ५०० रुपयांवर १०० रुपये
  • ५०१ ते १००० रुपयांवर ५०० रुपये 
  • १००१ के ५००० रुपयांवर ६०० रुपये
  • ५००१ ते १०००० रुपयांवर ७५० रुपये
  • १०००१ ते २५ रुपयांवर ९०० रुपये
  • २५००१ ते ५०००० रुपयांवर ११०० रुपये
  • ५० हजार रुपयांपासून अधिकच्या रकमेवर १३०० रुपये शुल्क आकारले जाईल.

 

शैक्षणिर व्यवहारांवर लागणार शुल्क
आंतरराष्ट्रीय शिक्षणासह कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केवळ थर्ड पार्टी ॲपद्वारे शैक्षणिक पेमेंटवर १ टक्के शुल्क भरावे लागेल.

युटिलिटी पेमेंट आणि इंधन ट्राझक्शन
१५ नोव्हेंबरपासून, वापरकर्त्यांना ICICI बँक क्रेडिटद्वारे ५०,००० रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी पेमेंटवर १ टक्के शुल्क भरावे लागेल, तर १०,००० रुपयांपेक्षा जास्त इंधन व्यवहारांवर १ टक्के शुल्क आकारले जाईल.

Web Title: icici bank credit card rules change from nov 15 2024 including finance charges late payment charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.