Lokmat Money >बँकिंग > देशातील दोन सरकारी आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेनं वाढवले व्याजदर, EMI महागणार

देशातील दोन सरकारी आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेनं वाढवले व्याजदर, EMI महागणार

देशातील काही मोठ्या बँकांनी एमएलसीआर (MCLR) दर वाढवला आहे. यानंतर आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणं महाग होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:15 PM2023-08-01T16:15:43+5:302023-08-01T16:16:09+5:30

देशातील काही मोठ्या बँकांनी एमएलसीआर (MCLR) दर वाढवला आहे. यानंतर आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणं महाग होणार आहे.

icici bank of india punjab national bank have increased interest mlcr rates EMIs will become expensive know details | देशातील दोन सरकारी आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेनं वाढवले व्याजदर, EMI महागणार

देशातील दोन सरकारी आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेनं वाढवले व्याजदर, EMI महागणार

देशातील काही मोठ्या बँकांनी एमएलसीआर (MCLR) दर वाढवला आहे. यानंतर आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणं महाग होणार आहे. यासोबतच महागड्या ईएमआयचा बोजाही ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. कर्ज महाग करणाऱ्या बँकांच्या यादीत आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR हा किमान दर आहे ज्याच्या खाली कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत या तीन मोठ्या बँकांकडून आता कर्ज घेणं किती महाग होणार आहे ते पाहू.

आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँकेनं सर्व कालावधीसाठी एमएलसीआर 5 बीपीएसनं वाढवला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, एका महिन्याचा एमएलसीआर दर 8.35 टक्क्यांवरून 8.40 टक्के झालाय. बँकेचा तीन महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.45 टक्के आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.80 टक्के झाला. एक वर्षाचा एमएलसीआर 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के करण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) ऑगस्ट महिन्यासाठी एमएलसीआर दरात कोणताही बदल केलेला नाही. बँकेच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट रेट 8.10 टक्के आहे आणि एक महिन्याचा एमएलसीआर दर 8.20 टक्के आहे. पीएनबीमध्ये, तीन महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.30 टक्के आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.50 टक्के आहे. एका वर्षासाठीचा एमएलसीआर आता 8.60 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.90 टक्के करण्यात आलाय.

बँक ऑफ इंडिया 
बँक ऑफ इंडियानं (BOI) आपल्या एमएलसीआर दरात बदल केले आहेत. तसंच निवडक मुदतीवरील दर वाढवले ​​आहेत. बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट रेट 7.95 टक्के, एका महिन्याचा एमएलसीआर दर 8.15 टक्के आहे. बँक ऑफ इंडियामध्ये, तीन महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.30 टक्के आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.50 टक्के आहे. एका वर्षासाठी एमएलसीआर आता 8.70 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.90 टक्के आहे.

Web Title: icici bank of india punjab national bank have increased interest mlcr rates EMIs will become expensive know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.