स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त IDBI आपल्याला अधिकचे व्याज मिळवण्याची संधी देत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या बँकेने विशेष एफडी जाहीर केली आहे. यात बँकेने, “375 दिवसांसाठी अमृत महोत्सव FD” आणि “444 दिवसांसाठी अमृत महोत्सव FD” ची घोषणा केली आहे. या विशेष FD योजनेंतर्गत, ग्राहकांना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत FD वर बम्पर परतावा मिळवण्याची संधी मिळत आहे.
अमृत महोत्सव एफडी योजना -
IDBI बँकेने लोकांना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विशेष FD योजनेंतर्गत अधिक व्याज मिळवण्याची संधी दिली आहे. या योजनेंतर्गत, आपल्याला वार्षिक 7.60 टक्के व्याज मिळू शकते. या योजनेंतर्गत दोन मुदतीची एफडी सुरू करण्यात आली आहे. 375 दिवसांसाठी अमृत महोत्सव FD वर 7.60 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर, 444 दिवसांसाठी अमृत महोत्सव FD वर वार्षिक 7.65 टक्के दराने व्याज ऑफर केले जात आहे.
महत्वाचे म्हणजे, IDBI बँक 444 दिवसांच्या नॉन कॅलेबल एफडी अर्थात, वेळेपूर्वी पैसे न काढल्यास 7.75 टक्के ब्याज ऑफर करत आहे. या योजनेचा लाभ घेण्याची आपली इच्छा अेसल, तर आपण 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा लाभ घेऊ शकता.