Join us

आयडीबीआयने थेट केंद्र सरकारला 'करंट' दिला! विकायला काढली आणि नफ्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 9:47 PM

आयडीबीआयमधून सरकार आपला हिस्सा विकत आहे. IDBI बँकेची निर्गुंतवणूक प्रक्रिया या आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

सार्वजनिक सेक्टरमधील सरकारने विकायला काढलेली बँक आयडीबीआयने सर्वांना धक्का दिला आहे. 2022-23 च्या अखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्चच्या तिमाहीतील शुद्ध नफा 64.1 टक्क्यांनी वाढून 1133 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत आयडीबीआय बँकेचा नफा हा 691 कोटी रुपये झाला आहे. 

आयडीबीआयमधून सरकार आपला हिस्सा विकत आहे. IDBI बँकेची निर्गुंतवणूक प्रक्रिया या आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. मार्च तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 3279.60 कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 2420.5 कोटी रुपयांपेक्षा हे प्रमाण 35.3 टक्क्यांनी जास्त आहे. बँकेची CAR वार्षिक आधारावर 19.06 टक्क्यांवरून 20.14 टक्क्यांवरून 20.44 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

आयडीबीआय बँकेने मार्च तिमाहीत 6.38 टक्के एनपीएससह मोठी सुधारणा केली आहे. बँकेचा निव्वळ एनपीए एका तिमाहीपूर्वी 1.08 टक्क्यांवरून 0.92 टक्क्यांवर आला आहे. IDBI बँकेच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पात IDBI बँकेशिवाय आणखी दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे ते रखडले असते. शुक्रवारी आयडीबीआय बँकेचे शेअर्स 0.37 टक्क्यांनी वाढून 54.55 रुपयांवर बंद झाले.