Personal Finance : सध्याच्या काळात कुठल्याही कर्जाचा हप्ता नाही असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. अगदी घरापासून खिशातील मोबाईलपर्यंत बहुतेक वस्तू आणि सेवांसाठी कर्जाची सोय आहे. बँकेत अनेक प्रकारची कर्जे उपलब्ध आहेत जसे की होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन इ. आजकाल, बहुतेक लोक घर किंवा कार खरेदी करताना कर्ज घेतात कारण एवढी मोठी रक्कम एकरकमी देणे प्रत्येकाला शक्य नसते. अचाकन उद्भवलेल्या परिस्थितीत पर्सनल लोनचाही पर्याय चांगला आहे. याशिवाय क्रेडिट कार्ड हा देखील एक कर्जाचा प्रकार आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर? त्या कर्जाची परतफेड भरण्याची जबाबदारी कोणाची आहे?
होम लोनजर एखाद्या व्यक्तीने गृहकर्ज घेतले असेल, तर त्या कर्जाच्या बदल्यात त्याला त्याच्या घराची कागदपत्रे किंवा त्या कर्जाच्या किमतीएवढी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवावी लागते. अशा परिस्थितीत, कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, थकबाकीची परतफेड करण्याची जबाबदारी सह-अर्जदार किंवा व्यक्तीच्या वारसांवर येते. अशा कर्जाची परतफेड केली नाही तर बँकेकडे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचा पर्याय त्यांच्याकडे असतो. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या गृहकर्जाचा विमा उतरवला असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर कर्जाची थकबाकी विमा कंपनीकडून वसूल केली जाते. अशा परिस्थितीत गहाण ठेवलेली मालमत्ता कुटुंबासाठी सुरक्षित राहते.
कार लोनकार लोन किंवा इतर कोणत्याही वाहन कर्जाच्या बाबतीत, कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, व्यक्तीच्या वारसांना किंवा इतर कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगितले जाते. जर कुटुंब असमर्थ ठरलं तर तर बँक किंवा फायनन्स कंपन्या कार किंवा कोणतेही वाहन जप्त करतात. या वाहनाची विक्री करून ते कर्जाची थकबाकी वसूल करतात.
पर्सनल लोनपर्सनल लोन हे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले आहे. कारण ते तारण मुक्त कर्ज असते. त्याची परतफेड करण्याची जबाबदारी फक्त कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची असते. कर्ज घेणाऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, बँक त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडू शकत नाही. पर्सनल लोन हे स्वतःच्या उत्पन्नाच्या आधारावर घेतले जाते. त्यामुळे कर्जदाराच्या मृत्यूसोबत लोनही संपते.
क्रेडिट कार्डक्रेडिट कार्डवर खर्च केलेली रक्कम देखील कर्ज मानली जाते. ही रक्कम परत करण्याची जबाबदारीही क्रेडिट कार्डधारकाची असते. परंतु, जर संबंधित व्यक्ती मरण पावली तर बँक कर्जाची थकबाकी राइट ऑफ करते. या कर्जाला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जबाबदार धरले जात नाही.