नवी दिल्ली : धनादेश न वटल्यास तो देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच आता त्याच्या दुसऱ्या बँक खात्यावरून पैसे वसूल करण्यात येतील. धनादेश अनादरित होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार नियमांत बदल करीत असून, त्यात ही तरतूद करण्यात येणार आहे.
लवकरच नवीन व्यवस्था लागू होईल. नव्या नियमांत धनादेशाचे पैसे कुठल्याही परिस्थितीत द्यावेच लागतील. धनादेश न वटल्यास शिक्षाही होऊ शकते.
नियम काय?नवी व्यवस्था लागू झाल्यानंतर धनादेश न वटल्यास क्रेडिट स्कोअर खराब होईल. या प्रकरणांत कर्ज थकबाकीचे नियम लागू होतील. सरकारला वाटते की, नियम अधिक कडक केल्यास धनादेश अनादरित होण्याच्या घटना कमी होतील.