Lokmat Money >बँकिंग > Credit Card ची थकबाकी भरली नाही तर, व्याज देईल टेन्शन; पाहा बँका किती घेतात व्याज

Credit Card ची थकबाकी भरली नाही तर, व्याज देईल टेन्शन; पाहा बँका किती घेतात व्याज

क्रेडिट कार्डची रक्कम वेळेवर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. पाहू कोणती बँक किती व्याजदर आकारते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 01:12 PM2023-11-23T13:12:19+5:302023-11-23T13:12:34+5:30

क्रेडिट कार्डची रक्कम वेळेवर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. पाहू कोणती बँक किती व्याजदर आकारते.

If the credit card balance is not paid the tension will pay increase high interest rates See how much interest banks charge | Credit Card ची थकबाकी भरली नाही तर, व्याज देईल टेन्शन; पाहा बँका किती घेतात व्याज

Credit Card ची थकबाकी भरली नाही तर, व्याज देईल टेन्शन; पाहा बँका किती घेतात व्याज

भारतात क्रेडिट कार्डचा वापर झपाट्यानं वाढला आहे. तुम्ही तुमच्या डेबिट कार्डनं पेमेंट करता तेव्हा थेट तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. पण क्रेडिट कार्डच्या बाबतीत असं होत नाही. यासह, तुम्ही केलेल्या खरेदीचं बिल तुम्हाला काही ठराविक दिवसांनंतर मिळतं. अशा प्रकारे क्रेडिट कार्ड ग्राहकांना लिक्विडिटीची सुविधा देतं. साधारणपणे, क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी २० ते ५० दिवसांचा कालावधी मिळतो. मात्र क्रेडिट कार्डची रक्कम वेळेवर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो.

आकारतात जास्त व्याज
ग्राहकानं दिलेल्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्डचं बिल भरलं नाही तर बँका व्याज आकारतात. हा व्याजदर ५० टक्क्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक असू शकतो. क्रेडिट कार्डच्या थकीत रकमेवर विविध बँका कोणते व्याजदर आकारतात ते आपण पाहूया.

आयडीएफसीचा व्याजदर कमी
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डचे व्याजदर सर्वात कमी आहेत आणि इंडसइंड बँकेचे व्याजदर सर्वाधिक आहेत. IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड्सवरील किमान व्याज दर ९ टक्के आणि कमाल ४७.८८ टक्के आहे. अॅक्सिस बँकेत हा दर किमान १९.५६ टक्के आणि कमाल ५२.८६ टक्के आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरील व्याज दर किमान २३.८८ आणि कमाल ४३.२० टक्के आहे.

यांचे दर सर्वाधिक
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या क्रेडिट कार्डवरील किमान व्याज दर २३.८८ टक्के आणि कमाल व्याजदर ४५ टक्के आहे. ICICI बँकेसाठी हा दर २९.८८ टक्के आणि कमाल ४४ टक्के आहे. कोटक महिंद्रा बँकेसाठी, हा दर किमान २९.८८ टक्के आणि कमाल ४४.४० टक्के आहे. SBI कार्डसाठी किमान ३३ टक्के आणि कमाल ४२ टक्के व्याजदर आहे. आरबीएल बँकेचा व्याजदर किमान ४०.८० टक्के आणि कमाल ४७.८८ टक्के आहे. अमेरिकन एक्सप्रेस बँकेसाठी हा दर किमान ४२ टक्के आहे. तर, इंडसइंड बँकेसाठी किमान दर ४६ टक्के आणि कमाल दर ४७.४० टक्के आहे.

Web Title: If the credit card balance is not paid the tension will pay increase high interest rates See how much interest banks charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक