Join us  

HDFC Credit Card Rule Change: HDFCचं क्रेडिट कार्ड वापरताय? उद्यापासून बदलणार नियम; तुमच्या खिशावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:29 AM

HDFC Credit Card Rule Change: आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यातील एका बदलाचा फटका एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना बसू शकतो.

HDFC Credit Card Rule Change: आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यातील एका बदलाचा फटका एचडीएफसीबँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना बसू शकतो. बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांकडून आता थर्ड पार्टी पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व रेंटल ट्रान्झॅक्शनच्या व्यवहारांवर एक टक्का रक्कम आकारली जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी कमाल मर्यादा तीन हजार रुपये असेल. पेटीएम, क्रेड, मोबिक्विक सारख्या थर्ड पार्टी पेमेंट अॅप्सचा वापर करून अनेकदा रेंटल ट्रान्झॅक्शन करण्यात येतात.

युटिलिटी ट्रान्झॅक्शनवर चार्ज

युटिलिटी ट्रान्झॅक्शनबद्दल बोलायचं झालं तर ५०००० रुपयांपेक्षा कमी व्यवहारांवर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र, ५०००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी १ टक्के शुल्क आकारलं जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी ₹३००० ची मर्यादा आहे. मात्र, विमा व्यवहारांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

इंधनावरील शुल्क

इंधन व्यवहारांबद्दल बोलायचं झालं तर १५,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर १ टक्के शुल्क आकारलं जाईल. यापेक्षा कमी किंमतीच्या व्यवहारांसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. अशा व्यवहारांची कमाल मर्यादा ३,००० रुपये प्रति व्यवहार आहे.

शैक्षणिक व्यवहारांवरील शुल्क

क्रेड, पेटीएम आदी थर्ड पार्टी अॅप्सद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर १ टक्के शुल्क आकारलं जाईल. प्रत्येक व्यवहारासाठी ३,००० रुपयांची मर्यादा आहे. मात्र, इंटरनॅशनल एज्युकेशन पेमेंटला या शुल्कातून वगळण्यात आलं आहे. त्याचबरोबर स्टेटमेंट क्रेडिट किंवा कॅशबॅकवर रिवॉर्ड रिडीम करणाऱ्या ग्राहकांकडून ५० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

त्याचप्रमाणे रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा ३.७५ टक्के शुल्क आकारण्यात येईल. हे व्यवहाराच्या तारखेपासून थकित रक्कम पूर्णपणे फेडेपर्यंत लागू राहील.

ईएमआय प्रोसेसिंग चार्जेस

कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये ईएसई-ईएमआय पर्यायाचा लाभ घेण्यासाठी २९९ रुपयांपर्यंत ईएमआय प्रोसेसिंग फी भरावी लागेल. याशिवाय एचडीएफसी बँकेने टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे.

टॅग्स :एचडीएफसीबँक