Lokmat Money >बँकिंग > पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर १९ तारखेपर्यंत करुन घ्या 'हे' काम, अन्यथा अकांऊंट होईल फ्रीझ

पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर १९ तारखेपर्यंत करुन घ्या 'हे' काम, अन्यथा अकांऊंट होईल फ्रीझ

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाहा काय म्हटलंय बँकेनं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 02:49 PM2024-03-14T14:49:26+5:302024-03-14T14:49:48+5:30

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाहा काय म्हटलंय बँकेनं.

If you are a customer of Punjab National Bank update kyc before 19th march otherwise the account will be frozen | पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर १९ तारखेपर्यंत करुन घ्या 'हे' काम, अन्यथा अकांऊंट होईल फ्रीझ

पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर १९ तारखेपर्यंत करुन घ्या 'हे' काम, अन्यथा अकांऊंट होईल फ्रीझ

पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या पंजाब नॅशनल बँकेच्या बँक खात्याचं केवायसी (KYC) झालं नसेल तर १९ मार्च २०२४ पर्यंत ते नक्की पूर्ण करा. म्हणजेच ग्राहकांकडे सध्या ६ दिवसांचा वेळ आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्या बँक खात्याचं केवायसी करणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. ही अंतिम मुदत त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत केवायसी अपडेट करायचं होतं.
 

बँकेनं केलं अलर्ट
 

बँकेनं ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवून केवायसी करण्यास सांगितलं आहे. जर बँक ग्राहकांनी असं केलं नाही तर तुम्ही १९ मार्च नंतर तुमचं बँक खातं वापरू शकणार नाही. बँकेच्या शाखेत जाऊन हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. तुम्ही असं न केल्यास तुमचं बँक खाते गोठवलं जाऊ शकतं.
 

केवायसी करण्याचे फायदे काय?
 

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक बँका ग्राहकांना नो युवर कस्टमर म्हणजेच केवायसी (Know Your Customer) करण्यासाठी अलर्ट करत आहेत. केवायसी करून घेतल्यानं, ग्राहकांचं बँक खातं सक्रिय राहील आणि ते पैशांची देवाणघेवाण, बिल भरणं इत्यादी अनेक गोष्टी सहज करू शकतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यास सांगत आहे. बँकेनं ग्राहकांना केवायसी करून घेण्याचं आवाहनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे केलं आहे.
 

कसं कराल चेक?
 

तुमच्या पंजाब नॅशनल बँकेचं केवायसी झालं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कस्टमर केअरला कॉल करावा लागेल. 18001802222 किंवा 18001032222 या कस्टमर केअरवर कॉल करून ग्राहकांना अधिक माहिती मिळू शकते असं बँकेनं म्हटलंय.

Web Title: If you are a customer of Punjab National Bank update kyc before 19th march otherwise the account will be frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.