SBI Car Loan EMI: कार विकत घेणं हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं, पण मध्यमवर्गीयांसाठी कार विकत घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. कार विकत घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते, ही मध्यमवर्गासाठी मोठी बाब आहे. अशा तऱ्हेनं कार खरेदी करण्यासाठी अनेकजण बँकेकडून कार लोन घेण्याचा विचार करतात. जर तुम्हालाही कार खरेदी करायची असेल आणि पैशांसाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला कार लोनच्या ईएमआयच्या गणिताबद्दल सांगणार आहोत.
एसबीआयकडून कार लोन घेतल्यास
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. तुम्ही एसबीआयकडून कार लोन घेऊ शकता. एसबीआयच्या कार लोनच्या व्याजदरांबद्दल बोलायचं झालं तर एसबीआयमध्ये कार लोनचे व्याजदर ९.२० टक्क्यांपासून सुरू होतात.
८ लाखांच्या लोनवर किती ईएमआय?
बहुतांश लोक ८ लाखांपर्यंतची कार खरेदी करतात. अशातच आज आम्ही तुम्हाला ८ लाखांपर्यंतच्या कार लोनच्या हिशोबाबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही एसबीआयकडून ५ वर्षांसाठी ८ लाखांचं कार लोन घेत असाल तर तुम्हाला दरमहा १६,६८४ रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. जर तुम्ही ५ वर्षांसाठी ८ लाखांचं कर्ज घेत असाल तर तुम्ही ५ वर्षांनंतर १०,०१,०६७ रुपये फेडाल. यामध्ये २,०१,०६७ रुपयांच्या व्याजाचा समावेश असेल.