HDFC UPI Service : भारतात दररोज हजारो कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार होत आहेत. यावरून देशात यूपीआयचा वापर कोणत्या स्तरावर केला जात आहे, याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. यूपीआयमुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज तर संपली आहेच, शिवाय व्यवहारही अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. पण या महिन्यात एचडीएफसी बँकेचे यूपीआय दोन दिवस बंद राहणार असून लोकांना यूपीआय वापरता येणार नाही. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.
एचडीएफसी बँकेनं दिलेल्या माहितीनुसार त्यांना नोव्हेंबरमध्ये दोन दिवस बँकेच्या यूपीआय सेवेचा वापर करू शकणार नाहीत. एचडीएफसी बँकेची यूपीआय सेवा नोव्हेंबरमध्ये दोन दिवस बंद राहणार आहे. एचडीएफसी बँकेच्या यूपीआय सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना ५ आणि २३ नोव्हेंबर रोजी यूपीआयद्वारे पैसे पाठवता येणार नाहीत किंवा युपीआयद्वारे पैसे घेताही येणार नाहीत.
यूपीआय सेवा कधी बंद राहणार?
एचडीएफसी बँकेनं दिलेल्या माहितीनुसार बँकेची यूपीआय सेवा ५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते २ पर्यंत २ तास आणि 23 नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते ३ या वेळेत पुन्हा ३ तास बंद राहील. या कालावधीत एचडीएफसी बँकेच्या चालू आणि बचत खात्यांवर तसेच रुपे कार्डवर कोणत्याही आर्थिक आणि बिगर वित्तीय यूपीआय व्यवहार करता येणार नाही, असं बँकेनं स्पष्ट केलंय. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या यूपीआय सेवेतून पेमेंट घेणाऱ्यांनाही या कालावधीत पेमेंट घेता येणार नाही.
जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या खात्यातून यूपीआय चालवत असाल तर एचडीएफसी बँकेचं मोबाईल अॅप, पेटीएम, फोनपे, गुगल पे, मोबिक्विक सारख्या यूपीआय अॅप्सद्वारे पैसे पाठवू किंवा मिळवू शकणार नाही. एचडीएफसी बँकेशी संलग्न असलेल्या खात्यातील यूपीआय व्यवहारांना परवानगी दिली जाणार नसल्याचं बँकेनं म्हटलंय.