सध्या पैशांच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी UPI चा वापर वाढला आहे. एका दिवसात अनेक वेळा अनेक व्यवहार केले जातात. सद्य स्थितीकडे पाहिलं तर डिजिटलायझेशन ध्खूप व्यापक झाले आहे. डिजिटल पेमेंट बहुतेक GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या ॲप्सद्वारे केली जाते. पण हो, तुम्हाला माहित आहे का तुम्ही UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवू शकता? वास्तविक, ही मर्यादा एनपीसीआयनेच निश्चित केली आहे.
एनसीपीआयनं युपीाय पेमेंट्सचं लिमिट निश्चित केलं आहे. एनसीपीआयनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना दिवसाला केवळ १ लाखांचं पेमेंटच करता येणार आहे. यापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करता येणार नाही. दररोज १००, २०० रुपयांचे व्यवहार करणाऱ्यांना कोणतीही समस्या नाही. परंतु एका दिवसात अधिक व्यवहार करणाऱ्यांना मात्र समस्या निर्माण होऊ शकतात.
GPay:
जर तुम्ही जीपे द्वारे व्यवहार करत असाल तर तुम्ही एका दिवसाला एक लाखांपर्यंतच व्यवहार करू शता. निरनिराळे व्यवहार जरी केले तरी तुम्हाला दिवसाला एक लाखांपर्यंतचेच व्यवहार करता येतात.
Paytm:
एनसीपीआय नुसार या ठिकाणीही तुम्ही १ लाखांपर्यंत व्यवहार करू शकता. पेटीएम तुम्हाला तासाला केवळ २० हजार रुपये पाठवण्याचे परवानगी देतं. एका तासात ५ ट्रान्झॅक्शन्स आणि जास्तीतजास्त २० व्यवहार करण्याची परवानगी मिळते.
PhonePe / Amazon Pay:
फोन पे आणि अमेझॉन पे ग्राहकांना दिवसाला १ लाख रुपयांपर्यंत व्यवहाराची परवानगी देतात. फोन पे मध्ये किती व्यवहार करायचाय हे त्या बँक खात्यावर अवलंबून असतं. तसंच अमेझॉन पेवर नोंदणी केल्यानंतर पहिल्या चोवीस तासांत केवळ ५ हजार रुपये ट्रान्सफर करता येतात.