Join us

ऐन दिवाळीत 'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका, कर्जाचे व्याजदर महागले; EMI वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 8:26 AM

दिवाळीपूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

ऐन दिवाळीत सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. वास्तविक, कॅनरा बँकेनं विविध कालावधीच्या आपल्या बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये ०.०५ टक्के वाढ केलीये. या वाढीनंतर कॅनरा बँकेकडून कर्ज घेणं आता महाग होणार आहे.स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीमध्ये, कॅनरा बँकेने म्हटलंय की त्यांनी विविध कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ०.०५ टक्क्यांनी वाढवला आहे. नवीन दर १२ नोव्हेंबरपासून म्हणजेच दिवाळीच्या दिवसापासून लागू होणार आहेत.एका वर्षाचा एमसीएलआर ८.७५ टक्केआता एक वर्षाचा MCLR ८.७५ टक्के असेल. सध्या हा दर ८.७० टक्के आहे. एक दिवस, एक महिना, ३ महिने आणि ६ महिन्यांचा एमसीएलआरदेखील ०.०५ टक्क्यांनी वाढवण्यात आलाय.काय आहे MCLR ?मार्जिनल कॉस्ट आधारित लेंडिग रेट हा बँकेच्या कर्जासाठी आकारू शकणारा किमान व्याजदर आहे. एमसीएलआर पूर्वी भारतातील बँका 'बेस रेट' वापरत असत. आरबीआयद्वारे एमसीएलआर १ एप्रिल २०१६ रोजी लागू करण्यात आला. एमसीएलआर मधील बदलांचा कर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो. दरम्यान, एका वर्षाच्या एमसीएलआरच्या बहुतेक बँका होम लोन, कार लोन, पर्सनल लोन देतात.

टॅग्स :बँक