गेल्या काही काळात महागाई झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे घर खरेदीसारखी आवश्यक बाबही महाग झाली आहे. मात्र जर तुम्ही घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आज घर आणि कारसाठीच्या कर्जावरील व्याजदरात मोठी घट केली आहे. बँकेकडून व्याजदरामध्ये ०.२० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याशिवाय बँकेने प्रोसेसिंग फी माफ करण्याचीही घोषणा केली आहे.
या कपातीसह गृहकर्ज आता सध्याच्या ८.६० ऐवजी ५० टक्के दराने उपलब्ध होईल. दुसरीकडे कार लोन हे ०.२० टक्क्यांनी स्वस्त होऊन ८.७० टक्के एवढं करण्यात आलं आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने सांगितले की, नवे दर हे १४ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. बँकेने सांगितले की, कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फी मधील सवलतीच्या दुहेरी लाभामुळे ग्राहकांवरील आर्थिक ओझं कमी करण्यास मदत होईल.