नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि आयसीआयसीआय बँक यांसह ४ बँकांनी कर्जाच्या व्याज दरात वाढ केली. १ जानेवारीपासून नवे दर लागूही झाले आहेत. आयसीआयसीआय बँकेने सर्वाधिक ०.१० टक्के वाढ केली आहे.
पीएनबीच्या एक महिन्याच्या कर्जावरील व्याजदर ८.२५ टक्क्यांवरून ८.३० टक्के झाला आहे एक वर्षाच्या कर्जाचा व्याज दर ८.६५ टक्क्यांवरून ८.७० टक्के झाला. पीएनबीने ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. २७१ दिवस ते १ वर्षाच्या ठेवींवर आता ६.२५ टक्के व्याज मिळेल. ४०० दिवसांच्या ठेवींवरील दर ६.८० टक्क्यांवरून ७.२५ टक्के केला आहे.
आयसीआयसीआय बँकेने १ महिन्याच्या कर्जावरील व्याजदर ८.५ टक्क्यांवरून वाढवून ८.६ टक्के केला आहे. १ वर्षाच्या कर्जावरील व्याज दर ९ टक्क्यांवरून ९.१० टक्के करण्यात आला आहे.
बैंक ऑफ इंडियाच्या ६ महिन्यांच्या कर्जावर ८.६० टक्के, एक वर्षाच्या कर्जावर ८.८० टक्के, तर ओव्हरनाईट कर्जासाठी ८ टक्के व्याज द्यावे लागेल. येस बँकेच्या १ वर्षाच्या कर्जावर १०.५ टक्के, ओव्हरनाईट कर्जावर ९.२०- टक्के आणि ६ महिन्यांच्या कर्जावर १०.२५ टक्के व्याज द्यावे लागेल.
नव्या वर्षात 'या' चार बँकांचा ग्राहकांना झटका, कर्जदारांचा ईएमआय वाढला
आरबीआयनं रेपो दरात वाढ केली नसली तरी काही बँकांकडून मात्र कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात येत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 03:06 PM2024-01-04T15:06:43+5:302024-01-04T15:08:01+5:30