Lokmat Money >बँकिंग > SBI मध्ये लंच टाईम नसतो का? बँकेनं सांगितली मोठी गोष्ट, जाणून घ्या

SBI मध्ये लंच टाईम नसतो का? बँकेनं सांगितली मोठी गोष्ट, जाणून घ्या

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं लंच टाईम संदर्भात मोठी गोष्ट सांगितली आहे. एका ग्राहकानं केलेल्या तक्रारीनंतर बँकेकडून त्यांना उत्तर देण्यात आलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 11:15 AM2023-01-15T11:15:42+5:302023-01-15T11:16:07+5:30

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं लंच टाईम संदर्भात मोठी गोष्ट सांगितली आहे. एका ग्राहकानं केलेल्या तक्रारीनंतर बँकेकडून त्यांना उत्तर देण्यात आलं. 

india s biggest bank SBI dont have lunch time The big statement made by the bank know details | SBI मध्ये लंच टाईम नसतो का? बँकेनं सांगितली मोठी गोष्ट, जाणून घ्या

SBI मध्ये लंच टाईम नसतो का? बँकेनं सांगितली मोठी गोष्ट, जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 'लंच टाईम' यांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दुपारच्या जेवणाची अधिकृत वेळ आहे का? यासंदर्भात बँकेने स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे. सोशल मीडियाच्या युगात ग्राहक ट्विटरवर बँकांना त्यांच्या समस्यांशी संबंधित प्रश्न विचारत आहेत. बँकाही त्यांना उत्तरे देतात. अशातच एका युजरने स्टेट बँकेला जेवणाच्या वेळेबाबत प्रश्न विचारला. यानंतर बँकेने दिलेले उत्तर सर्व ग्राहकांना माहित असणे आवश्यक आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांनी बँकांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. बँकाही ग्राहकांच्या तक्रारी सोडवत आहेत. या आशेने एका ग्राहकाने स्टेट बँक ऑफ इंडियाला ट्विटरवर प्रश्न विचारला होता - 'प्रिय स्टेट बँक ऑफ इंडिया, बँकेचा लंच किती वेळ चालतो हे कृपया मला सांगा. गेल्या दीड तासांपासून फक्त दुपारचे जेवण सुरू आहे. आम्ही घरात रिकामे बसलो आहोत का? आमच्याकडे काही काम नाही का? असा सवाल एका ग्राहकानं स्टेट बँकेला केला. ग्राहकाची ही समस्या सोडवण्यासाठी बँकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रिप्लाय देण्यात आला.



काय म्हटलंय बँकेनं?
असुविधेसाठी खेद आहे. आमच्या शाखांमध्ये स्टाफसाठी दुपारच्या जेवणासाठी कोणत्याही प्रकारची विशेष वेळ ठरवण्यात आलेली नाही. दुपारच्या जेवणाच्या वेळी शाखेत ग्राहकांचं येणं सुरू असतं आणि काम त्या दरम्यान सुरू असतं. जर तुम्हाला कोणत्याही शाखेशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकता असं बँकेनं म्हटलंय.

बँकेनं तक्रार करण्यासाठी एक लिंकही शेअर केली आहे. (https://crcf.sbi.co.in/ccf/ वर Personal Segment/Individual Customer General Banking>>Branch Related>>Slow Cash/Teller Service. आमची टीम तक्रारीचं निराकरण करेल असंही बँकेनं म्हटलंय.

Web Title: india s biggest bank SBI dont have lunch time The big statement made by the bank know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.