Jio Financial Services News: रिलायन्स इंडस्ट्रिजची फायनान्शिअल कंपनी जिओ फायनान्शिअल लिमिटेडनं JioFinance App लाँच केलं आहे. युझर्स प्लेस्टोअर, Apple स्टोअर आणि माय जिओ अॅपमधून हे अॅप डाऊनलोड करू शकतात. यामध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. यासंदर्भातील माहिती कंपनीनं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिली.
काय आहे खास?
नव्या जिओ फायनान्स अॅपमध्ये विविध प्रकारच्या फायनान्शियल फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, जिओ फायनान्स अॅपच्या मदतीनं आता तुम्हाला म्युच्युअल फंडांविरुद्ध लोन, होम लोन (बॅलन्स ट्रान्सफरसह) आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी सारख्या आर्थिक सुविधा मिळू शकतात. त्याचबरोबर ग्राहकांना यूपीआय पेमेंट, मोबाइल रिचार्ज आणि क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सारख्या सुविधाही देण्यात येणार आहेत.
बँक खातंही उघडता येणार
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक ५ मिनिटांत आपले डिजिटल बँक खाते देखील उघडू शकतात. जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडच्या (जेपीबीएल) मदतीनं ग्राहकांना आपलं डिजिटल खाते उघडता येणार आहे. जेपीबीएल ग्राहकांना सुरक्षित बँक खातं आणि फिजिकल डेबिट कार्ड सारख्या सुविधा देखील प्रदान करेल. ग्राहकांना त्यांच्या बायोमेट्रिक्सच्या मदतीनं हे बँक खातं वापरता येणार आहे. यासोबतच जिओ फायनान्समध्ये इन्शुरन्स प्लॅनही देण्यात येणार असून अॅपवर २४ हून अधिक विमा कंपन्यांच्या आकर्षक प्लॅन्सच्या ऑफर्स असतील, असंही स्पष्ट करण्यात आलंय.