Lokmat Money >बँकिंग > के. सत्यनारायण राजू कॅनरा बँकेचे नवे सीईओ आणि एमडी

के. सत्यनारायण राजू कॅनरा बँकेचे नवे सीईओ आणि एमडी

बँकेच्या निवेदनानुसार, नवनियुक्त सीईओ आणि एमडी के. सत्यनारायण राजू हे १९८८ पूर्वी विजया बँकेत रुजू झाले आणि बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य महाव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 10:53 AM2023-02-09T10:53:19+5:302023-02-09T10:54:45+5:30

बँकेच्या निवेदनानुसार, नवनियुक्त सीईओ आणि एमडी के. सत्यनारायण राजू हे १९८८ पूर्वी विजया बँकेत रुजू झाले आणि बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य महाव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले.

K. Satyanarayana Raju is the new CEO and MD of Canara Bank | के. सत्यनारायण राजू कॅनरा बँकेचे नवे सीईओ आणि एमडी

के. सत्यनारायण राजू कॅनरा बँकेचे नवे सीईओ आणि एमडी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने के. सत्यनारायण राजू यांची सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले के. सत्यनारायण हे एल.व्ही. प्रभाकर यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

बँकेच्या निवेदनानुसार, नवनियुक्त सीईओ आणि एमडी के. सत्यनारायण राजू हे १९८८ पूर्वी विजया बँकेत रुजू झाले आणि बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य महाव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या ३३ वर्षांच्या दीर्घ बँकिंग कारकिर्दीत त्यांनी १२ वर्षे विविध शाखांचे प्रमुख म्हणून नेतृत्व केले आहे. बँकेचा सर्वात मोठा झोन असलेल्या मुंबई झोनचे ते झोनल हेड देखील होते. ते भौतिकशास्त्रात पदवीधर आणि व्यवसाय प्रशासन (बँकिंग आणि वित्त) मध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत. वित्तीय सेवा संस्था ब्युरोने (एफएसआयबी) नोव्हेंबर २०२२ मध्ये राजू यांची या पदावर नियुक्ती करण्याची सूचना सरकारला केली होती. 

बँकिंगचा मोठा अनुभव
शाखा बँकिंग, कॉर्पोरेट क्रेडिट, रिटेल क्रेडिट, ॲग्री फायनान्सिंग, क्रेडिट मॉनिटरिंग, क्रेडिट रिकव्हरी, अनुपालन इत्यादींसह बँकिंगच्या सर्व विभागांमध्ये त्यांना खूप विस्तृत अनुभव आहे. त्यांच्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिजिटल सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

Web Title: K. Satyanarayana Raju is the new CEO and MD of Canara Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.