Union Budget
Lokmat Money >बँकिंग > शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजाने मिळणार ५ लाखांचं कर्ज! कुठे करायचा अर्ज? कोणती कागदपत्रे हवीत?

शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजाने मिळणार ५ लाखांचं कर्ज! कुठे करायचा अर्ज? कोणती कागदपत्रे हवीत?

Kisan Credit Card Limit : किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अवघ्या ४ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. हे कर्ज ५ वर्षांसाठी दिले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:13 IST2025-02-02T15:13:33+5:302025-02-02T15:13:52+5:30

Kisan Credit Card Limit : किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अवघ्या ४ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. हे कर्ज ५ वर्षांसाठी दिले जाते.

kisan credit card limit increased to rs 5 lakh know interest rate eligibility benefits | शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजाने मिळणार ५ लाखांचं कर्ज! कुठे करायचा अर्ज? कोणती कागदपत्रे हवीत?

शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजाने मिळणार ५ लाखांचं कर्ज! कुठे करायचा अर्ज? कोणती कागदपत्रे हवीत?

Kisan Credit Card Limit : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ५ लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला अवघ्या ४ टक्के व्याजदराने मिळते. तुम्हालाही हे कर्ज घेण्याची इच्छा असेल तर कुठे अर्ज करायचा? यासाठीची प्रक्रिया काय आहे? चला जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्डसाठी कोण पात्र आहे?
कृषी कामाव्यतिरिक्त मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, पशुपालन आणि फलोत्पादनात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळतो. यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. जसे भारतीय नागरिक असणे आणि शेतकऱ्याचे वय १८ ते ७५ वर्षे इत्यादी.

किसान क्रेडिट कार्ड कुठे मिळते?
किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला सरकारी, खाजगी बँका, ग्रामीण बँका किंवा सहकारी संस्थांकडे अर्ज करावा लागतो. किसान क्रेडिट कार्ड ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीसाठी अर्ज करता येतो. शेतकरी त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरू शकतात. अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
शेतकरी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर किंवा संबंधित बँकेच्या वेबसाइटवरूनही ऑनलाइन अर्ज करू शकतात. आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची चरण-दर-चरण प्रक्रिया सांगत आहोत.

किसान क्रेडिट कार्डच्या व्याजदरावर सरकारचे अनुदान
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत, सध्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, जे आता बजेटमध्ये ५ लाख रुपये करण्यात आले आहे. केसीसीचा व्याज दर वार्षिक ७ टक्के आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार व्याजावर सबसिडी देते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना ३% व्याज अनुदान मिळते. म्हणजे प्रत्यक्षात फक्त ४% व्याजाने तुम्हाला वर्षभर ५ लाख रुपये वापरायला मिळणार आहे.

कर्ज फेडण्याची मुदत?
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी कर्ज मिळते. पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण होते. शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्डवर वर्षातून दोनदा व्याज भरावे लागते. वर्षातून एकदा त्याला संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह जमा करावी लागते. मूळ जमा केलेली रक्कम शेतकरी दुसऱ्याच दिवशी काढू शकतो. वर्षातून दोनदा व्याज भरल्यानंतर आणि संपूर्ण कर्जाची रक्कम एकदाच जमा केल्यानंतरच शेतकऱ्याला व्याज अनुदान मिळते. जर त्याने असे केले नाही तर त्याला ७ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. व्याज वेळेवर न भरल्यास खाते NPA देखील होऊ शकते.

Web Title: kisan credit card limit increased to rs 5 lakh know interest rate eligibility benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.