Join us  

होम लोन घेताना केवळ व्याजदर जाणून घेणंच सर्वकाही नाही, 'या' ५ गोष्टीही नक्कीच समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 3:23 PM

Home Loan : जर तुम्ही पहिल्यांदा होमलोन घेणार असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी जाणून  घेणं महत्त्वाचं आहे. या टीप्स तुमच्या नक्कीच कामी येतील.

Home Loan : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या दृष्टीनं ते प्रयत्नही करत असतात. परंतु होम लोनमुळे हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळत आहे. सध्या अनेक ठिकाणी घरांच्या दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे घर खरेदी करणं सोपं राहिलेलं नाही. परंतु होम लोन घेत लोक आपलं हे स्वप्न पूर्ण करतात. परंतु होम लोन घेताना तुम्हाला व्याजदराशिवाय अन्य बाबी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा होम लोन घेणार असाल तर जाणून घ्या या काही महत्त्वाच्या टीप्स.

आर्थिक स्थिती तपासाहोम लोन घेण्यापूर्वी तुम्हाला डाऊनपेमेंटही करावं लागतं. हे तुमच्या प्रॉपर्टीच्या किंमतीच्या १० टक्के ते २५ टक्क्यांपर्यंत असू शकतं. याशिवाय लोन घेतल्यानंतर त्वरित तुमचा ईएमआय सुरू होईल. हा ईएमआय दीर्घ कालावधीपर्यंत चालतो. त्यामुळे पहिले तुमची आर्थिक परिस्थिती तपासा. जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. ॉ

लोनची रक्कम ठरवालोन घेण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या गरजा आणि देणी यानंतर तुम्ही सहजरित्या ईएमआय भरू शकता का हे पाहावं लागेल. यानंतर लोनची किती रक्कम घ्यायची हे ठरवावं लागेल. तुमचा ईएमआय हा तुमच्या टेक होम पेक्षा ४० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. 

लोन फीचर्सची तुलना करालोन घेताना तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असला पाहिजे. यामुळे तुमची विश्वासार्हता वाढते. तसंच लोन अप्रुव्ह होण्याची शक्यताही वाढते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला चांगल्या व्याजदरावर लोन मिळू शकतं. याशिवाय निरनिराळ्या बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग शुल्क वेगळं असू शकतं. लोन घेण्यापूर्वी फीचर्सची तुलना करा. त्यानंतर लोनसाठी अर्ज करा.

अधिक डाऊनपेमेंटचा फायदाजर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर तुम्ही अधिक डाऊनपेमेंट करा. यामुळे तुमचं लोन मंजुर होण्याची शक्यता वाढते. तर काही लेंडर्स कमी एलटीव्ही रेशोची निवड करणाऱ्या बॉरोअर्सना कमी व्याजदर उपलब्ध करून देतात. परंतु अधिक डाऊनपेमेंटसाठी इमर्जन्सी फंडाचा वापर करू नका.

इतका असावा इमर्जन्स फंडलोनसाठी अर्ज करणार असाल तरी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड ठेवा. हा तुमच्या सहा महिन्यांच्या ईएमआय इतका असायला हवा. अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा नोकरी गेल्यासारख्या स्थितीत ईएमआय भरणं कठीण होतं. त्यावेळी तुम्हाला त्यावर पेनल्टी लागू शकते आणि तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचा इमर्जन्सी फंड कामी येतो. 

टॅग्स :बँकपैसा