Join us

Kotak बँकेनं लाँच केलं संकल्प सेव्हिंग अकाऊंट, कॅश डिपॉझिटवरही शुल्क नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 5:31 PM

पाहा कोणते मिळणार यात बेनिफिट्स...

कोटक महिंद्रा बँकेनं मंगळवारी 'संकल्प बचत खातं' लाँच करण्याची घोषणा केली. यामध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये रोख डिपॉझिटवर शून्य शुल्क, वार्षिक जवळपास २४ लाखांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा आणि तिमाहीत केवळ २५०० रुपयांची किमान शिल्लक अशा सुविधा यात मिळणार आहेत.

सोनं, दुचारी आणि ट्रॅक्टरवर या विशेष दरात कर्जाची सुविधाही देण्यात येतेय. बँकिंग सेवा देण्‍याव्‍यतिरिक्‍त नवीन बचत खातं ग्रामीण व निम-शहरी ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक बँकिंग गरजांसाठी कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी टॉक टाइम व पेशॉपमोअर डेबिट कार्ड देखील देते. 

काय आहेत यातील फीचर्स?

  • सरासरी मासिक शिल्‍लक २५०० रूपये असलेल्‍या किंवा किमान ३६५ दिवसांसाठी २५,००० टर्म डिपॉझिट असलेल्‍या ग्राहकांसाठी २५० रूपयांचे वन टाईम बेनिफिट.
  • गोल्‍ड लोन आणि दुचाकी व ट्रॅक्‍टर कर्जावरील प्रोसेसिंग फीमध्ये अनुक्रमे १०० टक्‍के आणि ५० टक्‍के सूट. 
  • पेशॉपमोअर डेबिट कार्डसह स्‍थानिक एटीएममध्‍ये दररोज ४०,००० रूपये काढण्‍याची मर्यादा आणि दररोज २ लाख रूपयांपर्यंत खरेदी करण्‍याची मर्यादा. 
  • ५ लाखांपर्यंतच्या अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिटसाठी पेशॉपमोअर डेबिट कार्ड; लॉस्‍ट कार्ड लायबिलिटी; २,५०,००० रूपयांपर्यंत आणि दररोज डायनिंग, शॉपिंग आणि प्रवासासाठी विशेष ऑफर्स.
टॅग्स :व्यवसायबँक