Indian UPI : भारतात गेल्या काही वर्षांपासून UPI पेमेंट्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि तो UPI पेमेंटचा वापर करतो. UPI तंत्रज्ञानाची सुरुवात भारतात झाली असून, आता याचा जगातही डंका वाजत आहे. UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार केवळ भारतातच नाही तर परदेशातही वाढत आहेत.
नुकताच RBI ने UPI वरुन पेमेंटचा डेटा जारी केला आहे. आकडेवारीनुसार, UPI वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आरबीआय निर्देशांकानुसार मार्चमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये 13.24 टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे, भारतीय UPI च्या वापराला फ्रान्स, दुबई आणि सिंगापूरसह 17 देशांमध्ये मान्यता देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, येत्या 5 वर्षात केवळ भारतातच UPI द्वारे केले जाणारे पेमेंटही 90 टक्क्यांचा आकडा पार करेल. यामुळे डिजिटल पेमेंटचा ट्रेंड तर वाढेलच पण भारतीय अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होईल.
भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा
परदेशात UPI सुरू केल्यामुळे जे लोक भारताबाहेर जातील त्यांना फायदा होईल. ते तेथे UPI द्वारे भारतीय रुपयांमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय आणि करंसी एक्सचेंजशिवाय सहज पेमेंट करू शकतील. यामुळे देशात डिजिटल व्यवहारांची क्रेझ वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. UPI द्वारे भारतीय रुपयाने परदेशात पेमेंट केल्याने भारतीय रुपया आणखी मजबूत होईल.
या देशांमध्ये UPI सुरू
- फ्रान्स
- भूतान
- नेपाळ
- ओमान
- संयुक्त अरब अमिराती
- मलेशिया
- थायलंड
- फिलीपिन्स
- व्हिएतनाम
- सिंगापूर
- कंबोडिया
- हाँगकाँग
- तैवान
- दक्षिण कोरिया
- जपान
- युनायटेड किंगडम
- युरोप
परदेशात UPI कसे वापरावे
UPI द्वारे परदेशात पैसे भरणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुम्ही UPI साठी एखादे डाउनलोड करा. यानंतर तुमचे बँक खाते त्याच्याशी लिंक करा. ज्या व्यक्तीला पेमेंट करायची आहे, त्याचे तपशील टाका आणि पेमेंट करा. वरीलपैकी काही देशांमध्ये UPI प्राथमिक अवस्थेत आहे, त्यामुळे हळूहळू त्यात वाढ करण्यात येत आहे.