Lokmat Money >बँकिंग > LIC Scheme: LIC देत आहे 20 लाख रुपये, अनेकांनी घेतला फायदा; जाणून घ्या प्रोसेस...

LIC Scheme: LIC देत आहे 20 लाख रुपये, अनेकांनी घेतला फायदा; जाणून घ्या प्रोसेस...

Instant Loan LIC: पैशांची गरज भासल्यास अनेकजण बँकेतून कर्ज घेतात. पण, आता तुम्ही LIC कडून तात्काळ पैसे मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 08:49 PM2022-10-31T20:49:05+5:302022-10-31T20:49:22+5:30

Instant Loan LIC: पैशांची गरज भासल्यास अनेकजण बँकेतून कर्ज घेतात. पण, आता तुम्ही LIC कडून तात्काळ पैसे मिळवू शकता.

LIC Scheme: LIC is giving Rs 20 lakh loan, many have taken advantage; Know the process… | LIC Scheme: LIC देत आहे 20 लाख रुपये, अनेकांनी घेतला फायदा; जाणून घ्या प्रोसेस...

LIC Scheme: LIC देत आहे 20 लाख रुपये, अनेकांनी घेतला फायदा; जाणून घ्या प्रोसेस...

LIC Loan Online: पैशांची अर्जंट गरज भासल्यास अनेकजण बँकेतून कर्ज घेतात. पण, कधी-कधी बँकेतून कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व गोष्टींची पुर्तता करुनही अनेकदा कर्ज भेटत नाही. आता तुम्ही LIC कडून तात्काळ कर्ज घेऊ शकता. LIC आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. 

LICची कर्ज सुविधा
सध्या अनेक ग्राहक LICच्या या ऑफरचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे, हे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला LICच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. यासाठी काही आवश्यक अटी आहेत, जसे की तुमच्याकडे LIC ची विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. तसेच, तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावादेखील असावा. शाखा व्यवस्थापकाकडून तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि मगच कर्ज मिळेल.

एलआयसी वैयक्तिक कर्ज देईल
आता कर्जासाठी तुम्हाला बँकेच्या खेटा मारण्याची गरज नाही. LIC आता वैयक्तिक कर्ज देत आहे. तुम्ही घरबसल्या या कर्जासाठी अर्ज करू शकता. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे कर्ज 5 वर्षांसाठी असेल आणि या कर्जावर तुम्हाला फक्त 9% व्याज द्यावे लागेल. महत्वाची बाब म्हणजे, ज्यांच्याकडे LIC पॉलिसी आहे, तेच लोक या कर्जासाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, तुम्हाला किती कर्ज मिळेल, हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असेल.

कर्ज कसे मिळवायचे?
तुम्हाला एलआयसीच्या प्लॅनमधून कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. तेथे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल आणि तो डाउनलोड करुन त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. हा फॉर्म स्कॅन करून एलआयसीच्या वेबसाइटवर परत अपलोड करावे लागेल. येथून तुमची कर्ज प्रक्रिया सुरू होईल. या सुविधेत तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते.

Web Title: LIC Scheme: LIC is giving Rs 20 lakh loan, many have taken advantage; Know the process…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.