नवी दिल्ली:
सप्टेंबरमध्ये अनेक सुट्या आल्या आहेत. या महिन्यात देशातील काही ठिकाणी बँका १३ दिवस बंद रा शकतात. त्यामुळे बँकांमधील कामांचे ग्राहकांना योग्य नियोजन करावे लागणार आहे. बँकेत कामासाठी जाताना सुट्यांची माहिती घेतच बँकेत गेल्यास वेळ वाचणार आहे.
१ सप्टें. गणेश चतुर्थी (दुसरा दिवस), पणजी,
४ सप्टें. रविवार, सर्वत्र,
६ सप्टें. कर्मा पूजा रांची,
७ सप्टें. पहिला ओणम, कोची, तिरुवनंतपुरम,
८ सप्टें. थिरुओणम, कोची, रुवनंतपुरम,
९ सप्टें. इंद्रजत्रा, गंगटोक,
१० सप्टें. दुसरा शनिवार, सर्वत्र,
११ सप्टें. रविवार, सर्वत्र,
१८ सप्टें. रविवार, सर्वत्र,
२१ सप्टें. श्री नरवण गुरू समाधी दिन, कोची, तिरुवनंतपुरम,
२४ सप्टें. चौथा शनिवार, सर्वत्र,
२५ सप्टें, रविवार सर्वत्र, २५ सप्टें. नवरात्र स्थापना, जयपूर व लॅनिंगथोऊ सनमाही यांचा मेरा चाओरेन होउबा, इंफाल.
वरील यादीशिवाय वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कारणांनी बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर याची विस्तृत माहिती उपलब्ध आहे.