Join us  

Loan against property: प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घ्यायचंय? या गोष्टी लक्षात ठेवल्या तर राहाल फायद्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 3:36 PM

कधीकधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत मालमत्तेवर कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

कधीकधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत मालमत्तेवर कर्ज घेणे (Loan against property) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे तुम्हाला इतर पर्यायांच्या तुलनेत जास्त रकमेचे कर्ज देते. त्याचा व्याजदरही (Interest Rate) पर्सनल लोनपेक्षा कमी असतो.

लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी कर्ज हे सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे. यामध्ये तुम्ही तुमचे घर, औद्योगिक किंवा व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. सामान्यतः मालमत्तेवर कर्जाचा वापर व्यवसायाचा विस्तार, वैद्यकीय इमर्जन्सी, विवाह, मुलांचे उच्च शिक्षण इत्यादीसाठी कर्ज घेण्यासाठी केला जातो. मालमत्तेवर कर्ज देण्यासाठी बँका ग्राहकाचे उत्पन्न, क्रेडिट हिस्ट्री आणि मालमत्तेचे मूल्य पाहतात. जर तुम्ही मालमत्तेवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

क्षमता तपासाकर्ज घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की मालमत्ता गहाण ठेवण्यात धोका आहे. तुम्ही दर महिन्याला वेळेवर EMI न भरल्यास मालमत्ता तुमच्या हातातून जाऊ शकते. म्हणून, तुम्ही फक्त तेवढ्याच रकमेचे कर्ज घ्यावे, ज्याचा EMI भरणे तुम्हाला सोपे आहे. डीफॉल्टचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

इंटरेस्ट रेटची तुलना करामालमत्तेवरील कर्जाचा व्याजदर 9 ते 18 टक्क्यांपर्यंत असतो. हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर, त्याचे उत्पन्न, कर्जाचा कालावधी इ. चा समावेश असतो त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी कोणती बँक कोणत्या व्याजदराने कर्ज देते हे पाहणे फायद्याचे ठरेल.

प्रोसेसिंग फी तपासाबहुतेक बँका कर्जाच्या रकमेच्या सुमारे 1% प्रक्रिया शुल्क आकारतात. काही बँका कर्जाच्या रकमेवर आधारित प्रक्रिया शुल्क आकारतात. त्याची किंमत 50,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. प्रोसेसिंग फी तपासल्यानंतर तुम्ही बँक निवडावी.

लोनचा कालावधी लक्षात ठेवाबहुतांश बँका मालमत्तेवर १५ वर्षांसाठी कर्ज देतात. कर्जाचा कालावधी खूप महत्वाचा आहे कारण त्याचा तुमच्या EMI वर परिणाम होतो. कार्यकाळ जास्त असेल तेव्हा EMI कमी राहतो. पण, अधिक याजाच्या स्वरूपात अधिक पैसे द्यावे लागतात.

फिस्क्ड की फ्लोटिंग रेट?व्याजदरात थोडासा बदल झाल्यास फारसा परिणाम होत नाही. तथापि, कर्जाच्या परतफेडीचा कालावधी जास्त असल्याने व्याजदरातील मोठ्या बदलाचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे, तुम्ही व्याजदराच्या परिस्थितीवर आधारित स्थिर आणि फ्लोटिंग दर यापैकी एक निवडू शकता. परंतु सध्याची परिस्थिती पाहतो इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :बँक