Lokmat Money >बँकिंग > उद्योजकांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! व्यवसायासाठी मिळणार २० लाखांचं कर्ज, कोण आहेत लाभार्थी?

उद्योजकांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! व्यवसायासाठी मिळणार २० लाखांचं कर्ज, कोण आहेत लाभार्थी?

Mudra Loan : लहान उद्योजकांना मोदी सरकारने मोठी दिवाळी भेट दिली आहे. आता उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी २० लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 03:06 PM2024-10-25T15:06:26+5:302024-10-25T15:07:17+5:30

Mudra Loan : लहान उद्योजकांना मोदी सरकारने मोठी दिवाळी भेट दिली आहे. आता उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी २० लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

loan limit under pradhan mantri mudra yojana increased to 20 lakh rupees from current 10 lakh rupees | उद्योजकांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! व्यवसायासाठी मिळणार २० लाखांचं कर्ज, कोण आहेत लाभार्थी?

उद्योजकांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! व्यवसायासाठी मिळणार २० लाखांचं कर्ज, कोण आहेत लाभार्थी?

Pradhan Mantri Mudra Yojana : दिवाळीत आपल्या व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Mudra Yojana) पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून २० लाख करण्यात येईल. आता या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, ही मर्यादा वाढवल्याने मुद्रा योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल. तसेच व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी अधिक निधीची गरज असणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होईल.

सध्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत, ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लस (Tarun Plus)  नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा योजनेत शिशु अंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. किशोर योजनेअंतर्गत, व्यवसाय करणारे ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज घेऊ शकतात. तरुण योजनेंतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. आता तरुण योजनेंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत केलेल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तरुण प्लस श्रेणीचा लाभ घेता येईल. या योजनेत अशा उद्योजकांना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, मायक्रो युनिट्ससाठी क्रेडिट गॅरंटी फंड अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर हमी कव्हरेज दिले जाईल.
 

Web Title: loan limit under pradhan mantri mudra yojana increased to 20 lakh rupees from current 10 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.