Lokmat Money >बँकिंग > सोने गहाण ठेवून घेत आहेत कर्ज; कमी पावसामुळे उत्पन्नावर परिणाम

सोने गहाण ठेवून घेत आहेत कर्ज; कमी पावसामुळे उत्पन्नावर परिणाम

छोटे व्यावसायिक तसेच व्यक्तिगत पातळीवर लोक सोने गहाण ठेवीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:19 AM2023-10-20T07:19:08+5:302023-10-20T07:19:16+5:30

छोटे व्यावसायिक तसेच व्यक्तिगत पातळीवर लोक सोने गहाण ठेवीत आहेत.

Loans are being taken by mortgaging gold; Impact on income due to low rainfall | सोने गहाण ठेवून घेत आहेत कर्ज; कमी पावसामुळे उत्पन्नावर परिणाम

सोने गहाण ठेवून घेत आहेत कर्ज; कमी पावसामुळे उत्पन्नावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरात सणासुदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, त्याचवेळी देशात रोखीची समस्या निर्माण झाली आहे. लोक आपल्याकडील सोने गहाण ठेवून कर्ज घेताना दिसून येत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात हा कल दिसून येत आहे. छोटे व्यावसायिक तसेच व्यक्तिगत पातळीवर लोक सोने गहाण ठेवीत आहेत.

आरबीआयनुसार, ९५,४७६ कोटी रुपयांचे साेने तारण कर्ज दिले आहे. यात २३ टक्के वाढ झाली आहे. 

सोने तारण कर्जाची मागणी वाढणार
सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या सणासुदीच्या हंगामात सोने तारण कर्जाची मागणी किमान २० टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. जेव्हा जेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ होते, तेव्हा तेव्हा सोने तारण कर्जातही तेजी येते.

Web Title: Loans are being taken by mortgaging gold; Impact on income due to low rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं