Join us

IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 4:08 PM

किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या IDFC First बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. बँकेच्या संचालकीय मंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा गुंतवणूकदारांनाही होणार आहे. त्याचबरोबर बँकिंग प्रणाली आणि संचलन करण्यात मोठा बदल होणार आहे. 

IDFC First Bank IDFC Ltd Merger Update : IDFC लिमिटेडच्या संचालक मंडळाने कंपनीचे IDFC फायनान्शिअल कंपनी होल्डिंग कंपनी लिमिटेड (IDFC FHCL) आणि आयडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. IDFC Limited ने शुक्रवारी या निर्णयाची माहिती दिली. बँकेने म्हटले आहे की, या विलीनीकरणासाठी सर्व आवश्यक असलेल्या समभागधारकांच्या आणि नियामक परवानग्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) चेन्नई पीठाने २५ सप्टेंबर २०२४ रोजी विलीनीकरणालावर शिक्कामोर्तब केले. 

100  शेअर्सवर दिले जाणार 155 शेअर्स

IDFC First बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विलीनीकरण १ ऑक्टोबरपासून लागू होईल. त्यामुळे IDFC लिमिटेडच्या १०० शेअर्सवर IDFC First बँकेचे १५५ शेअर्स दिले जातील. १० ऑक्टोबर रेकॉर्ड तारीख असून, त्या आधारावरच हे दिले जातील. 

IDFC लिमिडेटच्या समभागधारकांना ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांच्या खात्यात शेअर जमा केले जातील, अशी शक्यता आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि परवानग्या पूर्ण व्हायला हव्या.

IDFC बँकेच्या कार्य प्रणालीमध्ये होणार बदल

या विलीनीकरणानंतर बँकेची प्रशासकीय कार्यप्रणाली सोप्पे होऊन जाईल, ज्यामध्ये होल्डिंग कंपनी असणार नाही. भारतातील खासगी बँकांप्रमाणे याचे काम चालेल आणि यात कोणतीही प्रमोटर होल्डिंग असणार नाही. विलीनीकरणामुळे बँकेत ६०० कोटी रुपयांचा कॅश फ्लो येईल. 

IDFC First बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व्ही. वैद्यनाथ यांनी विलीनीकरणावर बोलताना सांगितले की, "IDFC First बँक आणि IDFC लिमिटेडच्या विलीनीकरणाची घोषणा २ वर्ष खूप मेहनत घेतल्यानंतर झाली आहे. 

तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे IDFC लिमिटेडचा शेअर ११२ रुपयांवर आहे. दुसरीकडे IDFC First बँकेचा शेअर ७४ रुपयांवर आहे. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकगुंतवणूकशेअर बाजार