Lokmat Money >बँकिंग > SBI च्या या स्कीममध्ये डबल होईल पैसा, 1 लाखाचे बनतील 2 लाख रुपये! जाणून घ्या सविस्तर...

SBI च्या या स्कीममध्ये डबल होईल पैसा, 1 लाखाचे बनतील 2 लाख रुपये! जाणून घ्या सविस्तर...

यात बँक आपल्या ग्राहकांना 3 टक्क्यांपासून ते 6.5 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्क्यांपासून ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 09:49 PM2023-11-16T21:49:00+5:302023-11-16T21:49:56+5:30

यात बँक आपल्या ग्राहकांना 3 टक्क्यांपासून ते 6.5 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्क्यांपासून ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

Money will double in this scheme of SBI, 1 lakh will become 2 lakh rupees Know about details | SBI च्या या स्कीममध्ये डबल होईल पैसा, 1 लाखाचे बनतील 2 लाख रुपये! जाणून घ्या सविस्तर...

SBI च्या या स्कीममध्ये डबल होईल पैसा, 1 लाखाचे बनतील 2 लाख रुपये! जाणून घ्या सविस्तर...

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी अनेक स्कीम चालविल्या जात आहेत. यात गुंतवणुकीसाठी फिक्सड डिपॉझिटचाही एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ज्यात आपण कुठल्याही जोखमेशिवाय पैसा दुप्पट अथवा डबल करू शकता.  एसबीआयकडून ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी फिक्सड डिपॉझिटचा पर्याय मिळतो. यात 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची सुविधा मिळते.

यात बँक आपल्या ग्राहकांना 3 टक्क्यांपासून ते 6.5 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्क्यांपासून ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

1 लाखाचे होतील 2 लाख -
जर आपण एसबीआयमध्ये 10 वर्षांसाठी 1 लाख रुपये फिक्स केले, तर आपले पैसे डबल होतील. एसबीआयच्या एफडी कॅलक्युलेटरनुसार, यावर गुंतवणूकदारांना 6.5 टक्के दराने 90,555 लाख रुपये एवढे व्याज मिळेल. अर्थात गुंतवणूकदाराला 10 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर 90,555 रुपये मिळतील.

ज्येष्ठ नागरिकांनाम मिळतील 2,10,234 रुपये -
बँक वरिष्ठ नागरिकांना 7.5 टक्के दराने व्याज देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांसाठी एफडी केली तर त्यांचे पैसे डबल होतील. अर्थात, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची FD केली, तर त्यांना मॅच्युरिटीवर 2,10,234 रुपये मिळतील. यात एकूण 1,10,234 रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतील.

Web Title: Money will double in this scheme of SBI, 1 lakh will become 2 lakh rupees Know about details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.