No-cost EMI - सणासुदीच्या काळात गृहोपयोगी वस्तू, नवीन वाहन, बाईक आणि गॅजेट्स विकत घेण्याची आपण वाट पाहत असतो. सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या आणि ऑनलाइन किरकोळ विक्रेते ग्राहकांसाठी नो-कॉस्ट इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट (EMI) प्लॅनसह आकर्षक ऑफर घेऊन येतात. नो-कॉस्ट ईएमआय ऑफर ग्राहकांना अतिरिक्त व्याज किंवा शुल्क न भरता हप्त्यांमध्ये विविध उत्पादने खरेदी करण्यास मदत करते. नवीन गॅझेट किंवा गृहोपयोगी वस्तू घेण्यासाठी अनेक लोक नो-कॉस्ट ईएमआय योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतात. तथापि, खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला योजनेच्या काही पैलूंबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआय किंवा झिरो-कॉस्ट ईएमआय निवडता, तेव्हा याचा अर्थ तुम्ही त्या उत्पादनासाठी कोणतेही व्याज किंवा शुल्क न घेता मासिक हप्ते भराल. याचा अर्थ तुम्ही केवळ ईएमआयमध्येच पैसे द्याल आणि केवळ त्या उत्पादनाची ठराविक किंमत मासिक हप्त्यांमध्ये द्याल. बर्याच बँका वेगवेगळ्या पर्यायांमध्ये नो-कॉस्ट ईएमआय सुविधा देतात. काही बँका काही उत्पादनांवर शून्य-डाउन पेमेंट योजना देखील ऑफर करतात. जिथे तुम्हाला कोणतीही रक्कम आगाऊ भरण्याची आवश्यकता नसते आणि सहजपणे ती रक्कम तुम्ही मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता.
दुसरीकडे काही बँकांना डाउन पेमेंट म्हणून किमान रक्कम भरणे आवश्यक असते आणि शिल्लक रक्कम ईएमआयमध्ये भरली जाते. नो-कॉस्ट ईएमआय करताना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार परतफेडीचे वेगवेगळे कालावधी निवडू शकता. ते 3 महिन्यांपासून 24 महिन्यांपर्यंत कोणतेही असू शकते. आता ही योजना तुमच्या पुढील खरेदीसाठी योग्य वाटत असल्यास, तुम्हाला काही गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे. नो कॉस्ट EMI मध्ये मूळ रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नसले तरी, याचा अर्थ असा नाही की तुम्ही उत्पादनाची वास्तविक किंमत द्याल.
प्रोसेसिंग शुल्क
कर्ज देणाऱ्या अनेक संस्थांकडून नो-कॉस्ट ईएमआयसाठी प्रोसेसिंग फीदेखील आकारले जाते. हे त्या संस्थेला प्रोसेसिंग शुल्काच्या रूपात व्याज आकाराण्याची परवानगी देते. तसेच, नो-कॉस्ट ईएमआयची निवड करताना, तुम्हाला ज्या उत्पादनाचा लाभ घ्यायचा आहे त्यावर ऑफर केलेली सूट तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे याचे विश्लेषण करणे आणि त्यानंतरच नो-कॉस्ट ईएमआयसाठी जाणे चांगले. नो कॉस्ट EMI योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नियम आणि अटी वाचून घेणे फायद्याचे ठरते.