Lokmat Money >बँकिंग > बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही

बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही

पर्सनल लोनचे व्याजदर खूप जास्त असून दरमहा ईएमआय भरण्याचा बोजा डोक्यावर पडतो. पण पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असणारं कर्जही असतं आणि त्यात ईएमआयचा भार नसतो.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 17, 2025 11:00 IST2025-04-17T10:59:11+5:302025-04-17T11:00:36+5:30

पर्सनल लोनचे व्याजदर खूप जास्त असून दरमहा ईएमआय भरण्याचा बोजा डोक्यावर पडतो. पण पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असणारं कर्जही असतं आणि त्यात ईएमआयचा भार नसतो.

Most people don t know about this loan cheaper than a personal loan no EMI tension lic policy loan | बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही

बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही

आणीबाणीच्या परिस्थितीत पैशांची गरज भासते तेव्हा लोक क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोनचा विचार करतात. क्रेडिट कार्डवरून शॉर्ट टर्म लोन घेता येतं, पण पर्सनल लोन लाँग टर्मसाठी चांगलं मानलं जातं. मात्र, पर्सनल लोनचे व्याजदर खूप जास्त असून दरमहा ईएमआय भरण्याचा बोजा डोक्यावर पडतो. पण पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असणारं कर्जही असतं आणि त्यात ईएमआयचा भार नसतो. याची परतफेड प्रणाली इतकी सोपी आहे की आपण आपल्या सोयीनुसार कर्जाची परतफेड करू शकता. बहुतेक लोकांना याची माहिती नसते. या कर्जाबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

एलआयसी आपल्या सर्व पॉलिसींवर कर्ज सुविधा देते. जर तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल आणि त्यावर कर्जाची सुविधा असेल तर तुम्ही कठीण काळात त्या कर्जासाठी पैशांची व्यवस्था करू शकता. या कर्जासाठी जास्त कागदपत्रांची गरज नसते आणि ग्राहकाला कर्जाची रक्कम केवळ ३ ते ५ दिवसांच्या कालावधीत मिळू शकते.

किती आकारलं जातं व्याज?

एलआयसीवरील कर्जाचा एक फायदा म्हणजे आपल्याला आपली पॉलिसी सरेंडर करावी लागत नाही. अशा वेळी विम्यातून मिळणारे फायदे संपत नाहीत. याशिवाय पर्सनल लोनपेक्षा हे लोन स्वस्त आहे. तसेच ते घेताना कोणतीही प्रोसेसिंग फी किंवा छुपं शुल्क आकारले जात नाही. अशा वेळी कर्जाचा अतिरिक्त खर्च वाचतो. सर्वसाधारणपणे एलआयसी कर्ज ९% ते ११% व्याज दरानं मिळतं, तर वैयक्तिक कर्जावर १०.३०% ते १६.९९% पर्यंत व्याज आकारलं जाऊ शकतं.

परतफेड सोपी

एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेतल्यास त्याची परतफेड अगदी सोपी असते. कर्जाची परतफेड करण्यासाठी चांगला कालावधी मिळतो कारण कर्जाचा कालावधी किमान सहा महिन्यांपासून विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटीपर्यंत असू शकतो. अशा तऱ्हेनं ग्राहकासाठी आनंदाची बाब म्हणजे या कर्जावर दरमहा ईएमआय भरण्याचं टेन्शन नाही. पैसे जमा होत असल्याने त्यानुसार पैसे भरता येतात. पण त्यात वार्षिक व्याजाची भर पडत राहील, हे लक्षात ठेवा. जर एखाद्या ग्राहकानं कमीत कमी ६ महिन्यांच्या कालावधीत कर्जाची परतफेड केली तर त्याला ६ महिन्यांच्या संपूर्ण कालावधीसाठी व्याज द्यावं लागेल.

किती मिळेल कर्ज?

यामध्ये कर्जाची परतफेड तीन प्रकारे करता येते. पहिला मार्ग - संपूर्ण मुद्दल व्याजासह परत करा. दुसरा मार्ग - विमा पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळी दाव्याच्या रकमेसह मूळ रकमेचा निपटारा करा. अशा परिस्थितीत आता तुम्हाला फक्त व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे. तिसरा मार्ग - वार्षिक व्याजाची रक्कम भरा आणि मूळ रक्कम वेगळ्या पद्धतीनं फेडा. एलआयसीमधील कर्जाची रक्कम सरेंडर व्हॅल्यूनुसार ठरवली जाते. पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या ८० ते ९० टक्के कर्ज मिळू शकतं.

पॉलिसीवर मिळणारं कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे. कर्जाची परतफेड न केल्यास किंवा कर्जाची थकित रक्कम पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असल्यास कंपनीला आपली पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार आहे. कर्जाची परतफेड करण्यापूर्वी जर तुमची इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर झाली तर विमा कंपनी तुमच्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करू शकते.

Web Title: Most people don t know about this loan cheaper than a personal loan no EMI tension lic policy loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.