Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने सिंडिकेट कर्जाच्या माध्यमातून मोठी रक्कम उभारली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिची दूरसंचार शाखा Jio Infocomm ने बॅक-टू-बॅक परकीय चलन कर्जाच्या रूपात एकूण $ 5 अब्ज उभे केले आहेत. भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील गेल्या 5 वर्षातील हे सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.
रिपोर्टनुसार, रिलायन्सने गेल्या आठवड्यात 55 बँकांकडून $3 अब्ज जमा केले आणि आता रिलायन्स जिओ इन्फोकॉमने पुन्हा $2 बिलियनचे अतिरिक्त कर्ज मिळवले आहे. 31 मार्चपूर्वी 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यात आले होते. या आठवड्यात मंगळवारी दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज उभारण्यात आले.दरम्यान, रिलायन्स समूहाने 55 बँकांकडून तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. सुमारे दोन डझन तैवानच्या बँका 2 अब्ज कर्जासाठी पुढे आल्या आहेत.
याव्यतिरिक्त, बँक ऑफ अमेरिका, HSBC, MUFG, Citi, SMBC, Mizuho आणि Credit Agricole सारख्या जागतिक दिग्गजांसह सुमारे 55 बँकांनी US$ 3 अब्ज कर्ज दिले. रिलायन्स इंडस्ट्रीज प्रामुख्याने सिंडिकेट कर्जातून उभारलेल्या पैशाचा वापर त्यांच्या कॅपेक्स खर्चाची पूर्तता करण्यासाठी करेल, तर Jio हे पैसे त्यांच्या देशव्यापी 5G नेटवर्क रोलआउटसाठी वापरेल.