Join us  

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला घरघर; बँकिंग परवाना रद्द करण्याची नोटीस

By संजय पाठक | Published: August 31, 2023 12:19 PM

नोटीसीनंतर बँकेला वाचवण्यासाठी आता प्रयत्न सुरू

संजय पाठक, नाशिक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला घरघर लागली असून बँकेचा तोटा तब्बल 900 कोटींवर गेला आहे. त्यामुळे रिझर्व बँकेने या जिल्हा बँकेला बँकिंग करणार रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.

या नोटीसीनंतर बँकेला वाचवण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मुंबईतील दालनात काल सायंकाळी या संदर्भात बैठक झाली त्यांनी बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा तसेच प्रसंगी राज्य सरकार भाग भांडवल उपलब्धतेसाठी हमी देईल, असे सांगितले तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कठोर भूमिका घेत या बँकेवर आणखी किमान पाच वर्षे प्रशासकच असावेत आणि त्या माध्यमातून थकबाकीदारांसाठी एकरकमी तडजोड योजना राबवावी अशी सूचना केली.

या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :बँकनाशिक