Lokmat Money >बँकिंग > पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?  

पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?  

तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी तुम्ही बँकेतून १० हजार रुपये काढू शकता. पाहा कसं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:21 AM2023-11-30T10:21:09+5:302023-11-30T10:21:28+5:30

तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी तुम्ही बँकेतून १० हजार रुपये काढू शकता. पाहा कसं.

Need money and zero balance in account But you will get 10 thousand rupees see how pm jan dhan account | पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?  

पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?  

तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी तुम्ही बँकेतून १० हजार रुपये काढू शकता. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जन धन खातं असणे आवश्यक आहे. मोदी सरकारनं २०१७ मध्ये जन-धन खातं सुरू केलं होते. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत  (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) बँक खाते उघडल्यावर चेकबुक, पासबुक, अपघाती विमा इत्यादी अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. या सर्वांसोबतच ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. त्याच्या मदतीनं, तुमच्या बँक खात्यात शिल्लक नसतानाही तुम्ही जेव्हा गरज असेल तेव्हा पैसे काढू शकता.

प्रधानमंत्री जनधन योजना
या योजनेअंतर्गत झिरो बॅलन्सवर (Zero Balance Account) बँक खाती उघडली जातात. तुमच्या खात्यात किमान शिल्लक नसली तरी त्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. झिरो बॅलन्सवर चालणाऱ्या या खात्यानं कोट्यवधी लोकांना बचत खातं, विमा आणि पेन्शन यासारखे फायदे सहज मिळण्यास मदत केली आहे.

असे मिळतील १० हजार
जन धन योजनेअंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसतानाही तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचं जन धन खातं किमान ६ महिने जुनं असावं. असं नसल्यास, फक्त २ हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.

आकारलं जातं व्याज
ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला बँकेला नाममात्र व्याज द्यावे लागेल. मात्र यातून अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांच्या किरकोळ गरजा सहज पूर्ण होतात. कोणतीही अतिरिक्त कागदपत्रं आणि फाइल्स बनवण्याचा त्रास न घेता तुम्ही हे पैसे वापरू शकता.

खातं कसं उघडाल?
जन धन खातं उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. खातं उघडण्यासाठी किमान वय १० वर्षे आहे. एवढंच नाही तर तुम्ही तुमचं जुनं बचत खातं जन धन मध्ये रूपांतरित करू शकता.

Web Title: Need money and zero balance in account But you will get 10 thousand rupees see how pm jan dhan account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.