Join us  

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT, IMPS आणि RTGS कोण सर्वात वेगवान; किती लागतं शुल्क?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 2:42 PM

यूपीआय (UPI) आल्यामुळे डिजिटल व्यवहारांचा कल झपाट्यानं वाढला आहे पण तरीही एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर कमी झालेला नाही. एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो.

यूपीआय (UPI) आल्यामुळे डिजिटल व्यवहारांचा कल झपाट्यानं वाढला आहे पण तरीही एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर कमी झालेला नाही. एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो. आता प्रश्न पडतो की, यापैकी सर्वात वेगवान आणि उत्तम सुविधा कोणती? तसंच बँका त्याच्या वापरावर किती शुल्क आकारतात? चला, आपण याची माहिती जाणून घेऊ.

NEFT : नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या (एनईएफटी) माध्यमातून तुम्हाला २४ तास एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर एनईएफटी एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती देते. एनईएफटी व्यवहार सामान्यत: दोन तासांच्या आत पूर्ण होतात. रिझर्व्ह बँकेनं एनईएफटी व्यवहारांवर कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. परंतु, बँका एनईएफटी ट्रान्सफरवर स्वतःची मर्यादा लागू करू शकतात. १०,००० रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरसाठी बँक प्रत्येक व्यवहारासाठी २.५ रुपये आणि जीएसटी आकारते. ट्रान्सफरची रक्कम २ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास २५ रुपये आणि जीएसटी आकारला जातो.

IMPS : नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ही सेवा देते. यामुळे आरबीआयने अधिकृत केलेल्या बँकांमार्फत त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. आयएमपीएस रिअल-टाइम फंड ट्रान्सफर ऑफर करते. आयएमपीएस ट्रान्सफर सुविधा कोणत्याही बँकेच्या प्रत्येक खातेदारासाठी २४/७ उपलब्ध आहे. या माध्यमातून हा पैसे तात्काळ ट्रान्सफर होतात. आयएमपीएस ट्रान्सफरचं शुल्क सामान्यत: रकमेनुसार २५ रुपयांपर्यंत असते आणि बँकांप्रमाणे त्यात बदल होऊ शकतो.

RTGS : रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) ही एक प्रणाली म्हणून समजली जाऊ शकते ज्यामध्ये पैसे ट्रान्सफरची सतत आणि रिअल-टाइम सेटलमेंट होतेय आरटीजीएस फंड ट्रान्सफरसाठी अनेक फायदे देते. हे सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रणालीवर कार्य करते. आरटीजीएससाठी सध्याची शुल्क रचना पुढीलप्रमाणे आहे: २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी सेवा शुल्क २४.५० रुपये आणि जीएसटी आहे. ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी सेवा शुल्क ४९.५० रुपये आणि कर आहे.

टॅग्स :बँकपैसा