Join us

Rupay कार्डला चालना देण्यासाठी क्रेडिट-डेबिट, प्रीपेड कार्डांसाठी नवे नियम येणार? RBI करतंय तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 1:02 PM

रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्डसाठी नवीन नियम आणू शकते.

रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्डसाठी नवीन नियम आणू शकते. कारण मास्टर, व्हिसा सारख्या आघाडीच्या कार्ड नेटवर्कमध्ये रुपे कार्डची एन्ट्री झालेली नाही. रिझर्व्ह बँकेने डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड जारी करण्याबाबत एक मसुदा परिपत्रक जारी केलं आहे. क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्ड कोणत्याही विशेष नेटवर्कसाठीजारी करण्यात येऊ नये असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. कार्डाचा वापर सर्वच नेटवर्कमध्ये करण्याची मुभा मिळायला हवी असंही नमूद करण्यात आलंय.

रिझर्व्ह बँकेच्या मते, सध्या कार्ड नेटवर्क आणि कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या ग्राहकांचं हित पूर्णपणे विचारात घेत नाहीत. मर्चंट आणि कार्ड जारी करणारी कंपनी यांच्यातील व्यवहार सुलभ करणे ही कार्ड नेटवर्कची भूमिका असली पाहिजे. कंपन्या ग्राहकांकडून शुल्क वसूल करतात त्यामुळे कोणत्याही कार्ड नेटवर्कनं पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. कार्ड जारीकर्ते कोणत्याही एका नेटवर्कशी संबंधित नसावेत, जेणेकरून इतर कार्ड नेटवर्कचे ग्राहक ते वापरू शकणार नाहीत.

ग्राहकांना पर्याय मिळावेतकार्ड जारी करणार्‍या कंपनीनं एकापेक्षा जास्त नेटवर्कमध्ये चालणारे कार्ड जारी केले पाहिजेत आणि त्या निवडीसाठी पर्याय उपलब्ध असले पाहिजेत. सध्या ४ कार्ड नेटवर्क आहेत. यामध्ये मास्टर कार्ड, व्हिसा, अमेरिकन एक्सप्रेस आणि डिस्कव्हर यांचा समावेश होतो. यापैकी Amex आणि डिस्कव्हर कार्ड जारी करणारे आहेत.अनेकदा एका नेटवर्कचं कार्ड दुसऱ्या नेटवर्कमध्ये काम करत नाही त्यामुळे हा मसुदा तयार करण्यात आलाय. उदाहरणार्थ, काही ठिकाणी व्हिसा काम करत नाही आणि काही ठिकाणी ग्राहकांना मास्टरकार्डची कार्ड वापरण्यास समस्या येतात.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक