Join us

SBI मध्ये खातं नाही, तरीही YONO App द्वारे करता येणार UPI पेमेंट; Google पे, PhonePe ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:02 PM

सध्या देशभरात ऑनलाइन पेमेंट म्हणजेच डिजिटल पेमेंट्स मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. ग्राहक गुगल पे, फोन पे, पेटीएमसारख्या अॅप्सचा वापर करुन पेमेंट करत आहेत. प

सध्या देशभरात ऑनलाइन पेमेंट म्हणजेच डिजिटल पेमेंट्स मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. ग्राहक गुगल पे, फोन पे, पेटीएमसारख्या अॅप्सचा वापर करुन पेमेंट करत आहेत. परंतु आता या अॅप्सना टक्कर देण्यासाठी स्टेट बँकेनं कंबर कसलीये. आपलं डिजिटल अॅप्लिकेशन योनोची (YONO) व्याप्ती वाढवण्यासाठी स्टेट बँकेनं कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना युपीआय पेमेंट्ससाठी योनो अॅपचा वापर करण्याची परवानगी दिलीये. ग्राहकांना आता योनो अॅपचा वापर करण्यासाठी एसबीआयमध्येच अकाऊंट असणं अनिवार्य नाही. कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना या अॅपच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करता येतील. स्टेट बँकेनं २ जुलै रोजी योनो अॅपचं नवं व्हर्जन लाँच केलंय.

"योनो अॅपचा वापर करणं सोपं आणि सोयीस्कर बनवण्यात आलंय. आता कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना नव्या व्हर्जनमध्ये पेमेंटची सुविधा मिळेल. कोणताही ग्राहक क्युआर कोड स्कॅन करून, कॉन्टॅक्ट नंबरवरही रक्कम ट्रान्सफर करू शकेल," असं एसबीआयनं म्हटलंय. एबीआयनं यापूर्वी महिन्याच्या सुरूवातीला डिजिटल बँकिंग अॅप 'योनो फॉर एव्हरी इंडियन'ला पूर्णपणे रिव्हाइज करत लाँच केलं होतं.

कसं वापराल?एसबीआयनं दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर एसबीआयचे खातेधारक नसाल आणि योनो अॅपद्वारे युपीआय पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला ते करता येईल. योनो अॅप्लिकेशनद्वारे सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पहिले योनो अॅप डाऊनलोड करावं लागेल आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल. एसबीआय योनो अॅप Google Play Store आणि iPhone App Store वर उपलब्ध आहे.

टॅग्स :एसबीआयपैसाबँक