नवी दिल्ली : गृहकर्जावर खूप व्याज भरावे लागते. त्यामुळे अनेकजण घर खरेदी करत नाहीत. तुम्ही ३० लाख रुपयांचे
कर्ज ९ टक्के व्याज दराने २० वर्षे मुदतीसाठी घेतले, तर ३५ लाख रुपये व्याजात जातात. गृहकर्जावर व्याज भरण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही गृहकर्ज घेतले तेव्हाच एसआयपी सुरू करा.
व्याजमुक्त होण्याचे गणित
गृहकर्ज एसआयपी गुंतवणूक
कर्ज रक्कम : ३० लाख मासिक एसआयपी : ३,००० रुपये (कर्जाच्या ०.१०%)
कालावधी : २० वर्षे कालावधी : २० वर्षे
वार्षिक व्याज दर : ९% वार्षिक अनुमानित परतावा : १५%
मासिक हप्ता : २६,९९२ रुपये एसआयपीचे मूल्य : ₹४५.४७ लाख
एकूण भरणा : ₹६४.७८ लाख एकूण गुंतवणूक : ₹७.२० लाख
व्याज : ३४.७८ लाख रुपये एकूण परतावा : ३८.३७ लाख रुपये
इतकी रक्कम गुंतवा
nतुम्ही ३० लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी घेतले असेल, तर त्याच्या ०.१० टक्के म्हणजेच ३ हजार रुपये दरमहा इक्विटी म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवा.
nत्यावर अंदाजे १५ टक्के परतावा मिळाल्यास २० वर्षांत ३८.३७ लाख रुपये तुम्हाला मिळतील. ही रक्कम तुमच्या गृहकर्जावरील व्याजापेक्षा अधिक असेल.
असा समजून घ्या ‘पूर्व-भरणा’चा फायदा
कर्ज रक्कम : ३० लाख रुपये । कालावधी : २० वर्षे
एप्रिल २०२२ एप्रिल २०२३
विना पूर्व-भरणा पूर्व-भरणासह
व्याज दर ६.५% ९% ९%
मासिक हप्ता ₹२२,३६७ ₹२६,९९२ ₹२७,४७६
मासिक पूर्व-भरणा ०० ०० ₹४,०००
एकूण देय व्याज ₹२३.६८ लाख ₹३४.७८ लाख ₹२३.६८ लाख
एकूण देय रक्कम ₹५३.६८ लाख ₹६४.७८ लाख ₹५३.६८ लाख
बचत ०० ०० ₹११.१० लाख
कर्ज पूर्व-भरणा केल्यास...
सल्लागारांच्या मते, ३० लाखांच्या गृहकर्जावर ४ हजार रुपयांचा मासिक पूर्व-भरणा केल्यास व्याजदरातील २.५ टक्के वाढीचा परिणाम संपेल.
६.५ टक्के दरावर जेवढे व्याज लागेल, तेवढेच ९ टक्क्यांवरही लागेल.