Join us  

बँक खात्यात पैसे नाहीत, तरीही UPI द्वारे पेमेंट करता येणार, कसा घ्याल या सुविधेचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 4:14 PM

देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रणालीद्वारे होणारे व्यवहार वेगानं वाढत आहेत.

देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रणालीद्वारे होणारे व्यवहार वेगानं वाढत आहेत. आतापर्यंत युपीआयद्वारे व्यापाऱ्याला पेमेंट करण्यासाठी तुमच्या बँक खात्यात पैसे असणे आवश्यक आहे. परंतु खात्यात पैसे नसताना लवकरच तुम्ही पेमेंट करू शकाल. खरं तर, भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमधील व्यवहारांसाठी बँकांद्वारे जारी केलेल्या प्री अप्रुव्ह्ड क्रेडिट लाइनला मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, आता युपीआयमध्ये व्यवहारांसाठी बँकांद्वारे दिली जाणारी प्री अप्रुव्ह्ड लोन सेवा जोडली जाईल. यामुळे बँकांना ग्राहकाच्या खात्यात पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.

काय आहे क्रेडिट लाईन सुविधाक्रेडिट लाइन सुविधा हे एक प्रकारचं कर्ज असेल जे बँका त्यांच्या ग्राहकांना प्री अप्रुव्ह्ड करतील. म्हणजेच, बँका तुम्हाला निश्चित कर्जाची रक्कम अधीच मंजूर करतील. तुम्ही हे पैसे युपीआय पेमेंटसाठी आणि आवश्यकतेनुसार वापरू शकता. या अंतर्गत, यातून तुम्ही खर्च केलेल्या रकमेवर बँक तुमच्याकडून व्याज आकारेल. युपीआय क्रेडिट लाइन अंतर्गत, बँक तुमची क्रेडिट डिस्ट्री आणि प्रोफाइल लक्षात घेऊन कर्जाची मर्यादा ठरवेल. या कारणास्तव ही मर्यादा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते.

कसा घ्याल फायदाक्रेडिट लाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. यानंतर बँक ही सुविधा तुमच्या खात्याशी लिंक करेल. रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, बहुतेक सरकारी आणि खाजगी बँका लवकरच ही सुविधा सुरू करू शकतात.

टॅग्स :पैसाबँक