Lokmat Money >बँकिंग > KYC साठी ब्रान्चमध्ये जावं लागणार नाही, घरबसल्या होणार काम; या सरकारी बँकेनं सुरू केली सेवा 

KYC साठी ब्रान्चमध्ये जावं लागणार नाही, घरबसल्या होणार काम; या सरकारी बँकेनं सुरू केली सेवा 

आता ग्राहक बँकेत न जाता घरी बसून केवायसी करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:32 PM2023-08-23T14:32:43+5:302023-08-23T14:33:18+5:30

आता ग्राहक बँकेत न जाता घरी बसून केवायसी करू शकतात.

No need to go to branch for KYC do sitting at home bank of baroda government bank started the service how to do video kyc | KYC साठी ब्रान्चमध्ये जावं लागणार नाही, घरबसल्या होणार काम; या सरकारी बँकेनं सुरू केली सेवा 

KYC साठी ब्रान्चमध्ये जावं लागणार नाही, घरबसल्या होणार काम; या सरकारी बँकेनं सुरू केली सेवा 

Bank of Baroda Video Re-KYC Process: सार्वजनिक क्षेत्रातील बँकबँक ऑफ बडोदानं (BoB) आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदानं नवीन व्हिडीओ री-केवायसी सेवा सुरू केली आहे. आता ग्राहक बँकेत न जाता घरी बसून केवायसी करू शकतात. तुम्ही घरी बसून तुमची कागदपत्रे अपडेट करू शकता. ही सेवा व्हिडीओ री-केवायसी कॉल सर्व कामकाजाच्या दिवसांत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत करता येईल. व्हिडीओ रि केवायसी कसं करायचं ते आता पाहू.

ज्या ग्राहकांकडे आधार क्रमांक आणि पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठीच व्हिडीओ री-केवायसी सेवा उपलब्ध आहे. ही सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना बँक ऑफ बडोदा वेबसाइटला किंवा अॅपला भेट द्यावी लागेल. त्यानंतर "व्हिडीओ री-केवायसी" लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर त्यांचा खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर मोबाइलवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. ओटीपी एंटर केल्यावर, ते बीओबी बँकरशी जोडले जातील जो त्यांची ओळख व्हेरिफाय करेल. त्यांचे केवायसी दस्तऐवज अपडेट करेल.

बँकेत जाण्याची गरज नाही
व्हिडीओ री-केवायसी झाल्यानंतर बँक ग्राहकांची माहिती अपडेट करेल आणि व्हिडीओ कॉल संपल्यानंतर, ग्राहकांचे तपशील बँक रेकॉर्डमध्ये अपडेट होतील. त्यानंतर ग्राहकाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल. ज्या ग्राहकांचे री-केवायसी प्रलंबित आहे ते आता शाखेला भेट न देता त्यांचे व्हिडीओ केवायसी काही मिनिटांत पूर्ण करू शकतात, अशी माहिती बँक ऑफ बडोदानं दिलीये.

Web Title: No need to go to branch for KYC do sitting at home bank of baroda government bank started the service how to do video kyc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.