Bank of Baroda Video Re-KYC Process: सार्वजनिक क्षेत्रातील बँकबँक ऑफ बडोदानं (BoB) आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदानं नवीन व्हिडीओ री-केवायसी सेवा सुरू केली आहे. आता ग्राहक बँकेत न जाता घरी बसून केवायसी करू शकतात. तुम्ही घरी बसून तुमची कागदपत्रे अपडेट करू शकता. ही सेवा व्हिडीओ री-केवायसी कॉल सर्व कामकाजाच्या दिवसांत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत करता येईल. व्हिडीओ रि केवायसी कसं करायचं ते आता पाहू.
ज्या ग्राहकांकडे आधार क्रमांक आणि पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठीच व्हिडीओ री-केवायसी सेवा उपलब्ध आहे. ही सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना बँक ऑफ बडोदा वेबसाइटला किंवा अॅपला भेट द्यावी लागेल. त्यानंतर "व्हिडीओ री-केवायसी" लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर त्यांचा खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर मोबाइलवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. ओटीपी एंटर केल्यावर, ते बीओबी बँकरशी जोडले जातील जो त्यांची ओळख व्हेरिफाय करेल. त्यांचे केवायसी दस्तऐवज अपडेट करेल.
बँकेत जाण्याची गरज नाहीव्हिडीओ री-केवायसी झाल्यानंतर बँक ग्राहकांची माहिती अपडेट करेल आणि व्हिडीओ कॉल संपल्यानंतर, ग्राहकांचे तपशील बँक रेकॉर्डमध्ये अपडेट होतील. त्यानंतर ग्राहकाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल. ज्या ग्राहकांचे री-केवायसी प्रलंबित आहे ते आता शाखेला भेट न देता त्यांचे व्हिडीओ केवायसी काही मिनिटांत पूर्ण करू शकतात, अशी माहिती बँक ऑफ बडोदानं दिलीये.